32 C
Mumbai
Thursday, March 12, 2026
घरविशेषसलग दहाव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट

सलग दहाव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट

कुमार गट राष्ट्रीय खोखो; धाराशिवच्या जितेंद्र वसावेला वीर अभिमन्यू तर सुहानी धोत्रेला जानकी पुरस्कार

Google News Follow

Related

कुमार व मुलींच्या ४३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघाने सलग दहाव्यांदा विजेतेपद पटकावित  दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस्‌‍ स्टेडियमवर दुहेरी विजेतेपद मिळवताच खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.  कुमार गटाचे हे  १९ वे तर मुलींचे १० वे सलग विजेतेपद आहे. या विजयासह महाराष्ट्राच्या कुमारांचे हे एकूण ३५ वे तर मुलींचे २६ वे राष्ट्रीय अजिंक्यपद आहे.

शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दोन्ही गटात ओडिसा संघाला नामवित ही कामगिरी केली. मुलींच्या गटात अश्विनी शिंदेच्या (३.३०, २.३० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने ओडिसावर २४-२० असा ४ गुण व ५.१० मिनिटे राखून ओडिसाचा धुव्वा उडवत विजय मिळवला. मध्यंतरालाच त्यांनी १४-१० अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. यात अश्विनीला तन्वी भोसले (२.१० मि. संरक्षण), स्नेहा लामकाने (१.३० मि. संरक्षण), प्रणाली काळे (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी साथ दिली. त्यानंतरच्या डावात ओडिसाच्या संरक्षकांनी शानदार खेळी करीत लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्राच्या संरक्षक सुहानी ढोरे (१.२० मि. संरक्षण व ६ गुण) व प्राजक्ता बिराजदार यांनी (२ मि. संरक्षण) दुसऱ्या डावात बहारदार खेळी करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सानिका चाफे हिने आपल्या धारदार आक्रमणात पहिल्या डावात व दुसऱ्या डावात प्रत्येकी चार खेळाडू  टिपले. ओडिसाच्या अर्चना प्रधान (२.०० मि. ४ गुण ), लीसा राणी (१.०० मि. ६ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

हे ही वाचा:

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘इंडी’ला दणका देत ‘आप’चा एकला चलोचा नारा

आता बदायूँमधील जामा मशिद म्हणजे नीळकंठ महादेव मंदिर!

“बीएसएफचे जवान भारताचा सन्मान, महत्त्वाकांक्षा जपण्यासाठी भक्कम ढाल म्हणून उभे”

नाराजी वाढणार, गृहमंत्रीपदाची शक्यता कमी

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडीसावर ३३-२९ अशी १.३० मिनिटे राखून मात केली व सलग विजेतेपदाचे दावेदार महाराष्ट्रच असल्याचे दाखवून दिले. मध्यंतराची १८-१४ ही चार गुणांची आघाडीच महाराष्ट्राला विजय मिळवून देऊन गेली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे (२.३०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), कृष्णा बनसोडे (१.४०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण) यांच्या अष्टपैलू खेळाचा समावेश आहे. पार्थ देवकते व प्रेम दळवी यांनी प्रत्येकी सहा गडी बाद करीत विजयात जोरदार साथ दिली. ओडीसाकडून बापी मुरमु (२.००, १.२० मि. संरक्षण व २ गुण ), सुनील पात्रा (१.३०, १.०० मि. संरक्षण व ६ गुण ) यांची लढत अपुरी पडली.

 

मुलांचे प्रशिक्षक युवराज जाधव व मुलींचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी विजयानंतर खेळाडूंनी संघभावनेने खेळ केल्याचे सांगितले व यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी पूर्णपणे पाठीशी असल्याने सर्व सुविधा मिळाल्या व विजय सुकर झाल्याचे स्पष्ट केले.

सुहानी धोत्रे ‘जानकी’, जितेंद्र वसावे ‘वीर ‘अभिमन्यू’चे मानकरी

सर्वोत्कृष्ट अष्टपैलू  खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्काराचा जितेंद्र वसावे हा तर सुहानी धोत्रे ही जानकी पुरस्काराची मानकरी ठरली. हे दोघेही धाराशिवचे आहेत. अन्य पुरस्काराचे मानकरी : आक्रमक : प्रेम दळवी (सांगली, महाराष्ट्र), लीसा राणी (ओडीसा), संरक्षक : बापी मुरमु (ओडीसा), तन्वी भोसले (धाराशिव, महाराष्ट्र).

—–

महाराष्ट्राचे ड्रीम गुणही वसूल

यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेपासून ड्रीम गुण देण्यास सुरुवात झाली. एका तुकडीत तीन खेळाडू असतात. या तिघांनी मिळून चार मिनिटे  संरक्षण केल्यास एक ड्रीम गुण मिळतो.  त्यानंतर प्रत्येक मिनिटाला ती तुकडी बाद होईपर्यंत एक ड्रीम गुण मिळतो. महाराष्ट्राच्या मुलांनी १ व मुलींनी ४ गुण वसूल केले. ओडीसाच्या मुलांनीही एक गुण कमावला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा