20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरविशेषमहाराष्ट्राच्या महिला कडाडल्या तर पुरुषांमध्ये रेल्वे धडाडली

महाराष्ट्राच्या महिला कडाडल्या तर पुरुषांमध्ये रेल्वे धडाडली

Related

राष्ट्रीय खोखोत दुहेरी मुकुट जिंकण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न भंगले

जबलपूर, मध्य प्रदेश येथे झालेल्या ५४ व्या राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत दोन्ही गटात विजेतेपद मिळविण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न भंगले. महाराष्ट्राच्या महिलांनी सुवर्णपदक मिळवताना भारतीय विमान प्राधिकरणाला धूळ चारली, पण पुरुषांत रेल्वेपुढे महाराष्ट्राच्या पुरुषांचा वेग कमी पडला. भारतीय रेल्वेने सुसाट खेळी करताना महाराष्ट्राच्या दुहेरी मुकूटाच्या हॅट्रिक मिळवण्याच्या स्वप्नांचा चुराडा केला. या स्पर्धेत महिलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा दिला जाणार्‍या राणी लक्ष्मीबाई पुरस्कारावर महाराष्ट्राची कर्णधार प्रियांका इंगळेने नाव कोरले. तर पुरुषांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या एकलव्य पुरस्कारावर रेल्वेच्या महेश शिंदेने नाव कोरले आहे. महिलांमध्ये महाराष्ट्राला २३ वे तर पुरुषांमध्ये १० वे अजिंक्यपद मिळाले आहे.

महिलांच्या अंतिम सामान्यत महाराष्ट्राने भारतीय विमान प्राधिकरणाचा १३-११ (मध्यंतर ७-६) असा २ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (कर्णधार) (१:३०, २:१० मि. संरक्षण व ३ बळी), रेश्मा राठोड (१:४०, २:०० मि. संरक्षण व २ बळी), अपेक्षा सुतार (१:३०, १:५० मि. संरक्षण व १ बळी), रुपाली बडे (१:२०, २:०० मि. संरक्षण), स्नेहल जाधव (१:५० मि. संरक्षण व १ बळी), पूजा फरगडे (३ बळी) यांनी चतुरस्त्र खेळी करताना महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. विमान प्राधिकरणाच्या प्रियंका भोपी (२:००, २:२० मि. संरक्षण व ३ बळी), ऐश्वर्या (२:००, १:५० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली मात्र त्या आपल्या संघाला परभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

हे ही वाचा:

ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट!!! लागू केली ‘ही’ नवी नियमावली

‘आम्ही २० करोड मुसलमान…’ नसिरुद्दीन शहांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड

‘मुघल हे तर राष्ट्र निर्माते!’ नासिरुद्दीन शहांचा जावई शोध

‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापण्याची मोदींची इच्छा होती!’ पवारांची नवीन पुडी

पुरुषांच्या अंतिम सामान्यत रेल्वेने महाराष्ट्राचा १४-१३ (मध्यंतर ८-७) असा १:४० मि. राखून एक गुणाने विजय मिळवला. खरतर सुसाट सुटलेल्या रेल्वेला रोखण्यात महाराष्ट्राचे पुरुष अपयशी ठरले. रेल्वेच्या महेश शिंदे (२:००, १:१० मि. संरक्षण व २ गडी), दिपेश मोरे (१:५०, १:१० मि. संरक्षण व २ गडी) व मिलिंद चावरेकर (१:३०, १:१० मि. संरक्षण व १ गडी) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. तर महाराष्ट्राच्या प्रतीक वाईकर (१:३०, १:०० मि. संरक्षण व १ गडी), सागर लेंगरे (१:४० मि. संरक्षण) व अक्षय भांगरे (१:१०, १:०० मि. संरक्षण व १ गडी) यांनी दिलेली लढत कमी पडल्यानेच रेल्वेला सुवर्णपदक मिळू शकले.

तृतीय क्रमांकाच्या पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूर तर महिलांच्या सामन्यात कर्नाटक विजयी ठरले तर दोन्ही गटात अनुक्रमे कर्नाटक व हरयाणा चौथ्या क्रमांकावर राहिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा