27 C
Mumbai
Friday, August 19, 2022
घरविशेषमहाराष्ट्राचा किशोर संघ उपांत्यपूर्व फेरीत; आता राजस्थानला भिडणार

महाराष्ट्राचा किशोर संघ उपांत्यपूर्व फेरीत; आता राजस्थानला भिडणार

Related

महाराष्ट्राच्या मुलांनी ३१ व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र राजस्थान अशी झुंज होईल. किशोर गटात महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, हरियाणा, बिहार यांनी, तर किशोरी गटात भारतीय क्रीडा प्राधिकरण ‘साई’, हरियाणा, उत्तर प्रदेश,बिहार, दिल्ली, यजमान उत्तराखंड, पंजाब यांनी देखील उपांत्यपूर्व फेरी गाठली.
उदमपूर जिल्ह्यातील नांकपुरी-सुद्रापूर येथे सायंकाळच्या सत्रात झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने ओडीसाचा प्रतिकार ३८-०७ असा सहज मोडून काढला.मध्यांतरालाच २२-०३ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील तोच धडाका सुरू ठेवत हा विजय साकारला. रोशन केशीचा अष्टपैलू खेळ त्याला अंकुश भांडे, सिद्धार्थ मुरूमकर यांची मिळालेली चढाईची, तर नवाज देसाई, नौशाद शेख यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय मिळविला. ओडीसाचा प्रतिकार अगदीच दुबळा ठरला.
मुलांच्या इतर उपउपांत्य सामन्यात राजस्थानने हिमाचल प्रदेशला ५५-३४; छत्तीसगडने झारखंडचा ५६-२६; आंध्र प्रदेशने तेलंगणाला ४७-४२; हरियाणाने मध्य प्रदेशाला ४५-२४; बिहारने तामिळनाडूला ३९-२७ असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. किशोरी(मुली) गटात ‘साई’ने आंध्र प्रदेशचा ४५-१५; हरियाणाने राजस्थानचा ३०-२५; उत्तर प्रदेशने गोव्याचा २५-१७; बिहारने छत्तीसगडचा ४७-२३; दिल्लीने विदर्भाचा ४३-२३; यजमान उत्तराखंडने हिमाचल प्रदेशचा ४१-३७; पंजाबने चंदीगडचा ३१-२८ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
हे ही वाचा:
सकाळच्या सत्रात झालेल्या किशोर(मुले) अ गटातून महाराष्ट्र, उत्तराखंड; २) ब गटातून हरियाणा, झारखंड; ३) क गटातून तेलंगणा, बिहार; ४) ड गटातून दिल्ली, हिमाचल प्रदेश; ५) इ गटातून राजस्थान, उत्तर प्रदेश; ६)फ गटातून तामीळनाडू, आंध्रप्रदेश (OD); ७) ग गटातून छत्तीसगड, मध्य प्रदेश; ८) ह गटातून गुजरात, ओडीसा यांनी बाद फेरी गाठली.तर किशोरी(मुली) १) अ गटातून साई, चंदीगड; २)ब गटातून दिल्ली, गोवा; ३) क गटातून बिहार, हिमाचल प्रदेश; ४)ड गटातून तामीळनाडू, राजस्थान; ५) इ गटातून हरियाणा, मध्य प्रदेश; ६) फ गटातून उत्तराखंड, छत्तीसगड; ७) ग गटातून उत्तर प्रदेश, विदर्भ; ८) ह गटातून पंजाब, आंध्र प्रदेश(OD) यांनी बाद फेरी गाठली.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,910चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा