30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरविशेष'खेळाडूंची कामगिरी पाहून मेजर ध्यानचंद आनंदात असतील'

‘खेळाडूंची कामगिरी पाहून मेजर ध्यानचंद आनंदात असतील’

Related

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांची आठवण काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा हा ८० वा भाग होता. क्रीडा दिनाचे निमित्त साधून नरेंद्र मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले.

४१ वर्षांनंतर हॉकीचे नवीन रूप पाहायला मिळाले, असेही ते म्हणाले. ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले की, मेजर ध्यानचंद आता जिथे कुठेही असतील ना तिथे ते खूप आनंदात असतील. भारतीय हॉकीला जगामध्ये ओळख देण्याचे काम ध्यानचंद यांच्या हॉकीनेच केले होते. टोकियो ऑलिम्पिकमधील भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या दमदार कामगिरीची आठवण करून जवळपास चाळीस वर्षांनंतर भारताच्या युवा पिढीने पुन्हा एकदा हॉकीमध्ये चैतन्य निर्माण केले आहे.

‘मन की बात’ कार्यक्रमाच्या या भागात ‘बाहेर या आणि खेळा’ असा संदेश देण्यात आला. ऑलिम्पिक स्पर्धा संपली, पॅरालिम्पिक स्पर्धा आता सुरू आहे. पण खेळाच्या चर्चा मात्र घराघरात सुरू झाल्या आहेत. या चर्चा कधीच थांबता कामा नयेत. मैदाने खेळाडूंनी भरायला हवीत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

वसई-विरारमध्ये  गुन्हेगारांचा उच्छाद; पोलिसांनी इतक्या जणांना घेतले ताब्यात

दिव्यांगांच्या डब्यात धडधाकटांची गर्दी

सावधान! कोरोनाची तिसरी लाट येतेय?

‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे

खेळ म्हटले की, आपल्या समोर येते ती युवा पिढी. आताच्या युवा पिढीकडे आपण नीट पाहिले की त्यांच्यातील बदल आपल्याला दिसून येतो. आजची युवा पिढी बदलली आहे. त्यांना सतत काहीतरी वेगळं करायचं असत. कोणीही पूर्वीपासून तयार केलेल्या मार्गावर चालण्यापेक्षा त्यांना स्वतःचा मार्ग स्वतः बनवायला आवडतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी क्रीडा दिनाचे औचित्य साधून फिट इंडिया मोबाईल अ‍ॅप लॉन्च केले. या अ‍ॅपमुळे प्रत्येकाला स्वतःच्या स्वास्थ्याची माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यावर काही व्हिडीओ आणि इतर गोष्टीही असतील, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा