27 C
Mumbai
Thursday, July 25, 2024
घरविशेष‘ममता दीदी, आम्हाला विष द्या म्हणजे आम्ही शांतपणे मरू शकू’

‘ममता दीदी, आम्हाला विष द्या म्हणजे आम्ही शांतपणे मरू शकू’

संदेशखालीतील महिलेचा उद्वेग

Google News Follow

Related

शुक्रवार, १४ जून रोजी एका महिलेचा तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलेल्या अत्याचाराचे कथन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.राजकीय भाष्यकार अभिजित मजुमदार यांनी ‘एक्स’ वर व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये एक हिंदू महिला बंगालीमध्ये म्हणताना ऐकू येत आहे. ‘माझा नवरा भाजपचा पोलिंग एजंट होता. त्यांनी माझ्या पतीविरुद्ध (बनावट) गुन्हाही दाखल केला होता. तो कालपासून बेपत्ता आहे.

गावातली माणसं घरी नसतात. तृणमूलच्या गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली, ‘ असे ही महिला यात म्हणताना ऐकू येत आहे.‘ज्यांना हे सहन करावे लागले ते आयुष्यभर अपंग होतील. पुरुषांना क्रूरपणे मारहाण करण्यात आली आणि त्यांना जमिनीवर ढकलण्यात आले,’ असे ही महिला सांगत आहे. ‘कृपया आमचा संदेश ममता बॅनर्जींपर्यंत पोहोचेल, याची खात्री करा – आम्हाला विष द्या जेणेकरून आम्ही शांतपणे मरू शकू. नाहीतर आम्हा सर्वांचे अपहरण करा. आम्हाला आता जगायचे नाही,’ असा आक्रोश ही महिला करत आहे.

‘आमच्या घरी लहान मुले आहेत. आमच्या घरी अन्न नाही. आम्ही बाजारात जाऊन आमच्या मुलांच्या तोंडात साधा भात घालू शकत नाही,’ असे ही महिला म्हणत आहे.‘आमच्या अस्तित्वाचा उद्देश काय आहे? आमचा मृत्यू झाला, तरच बरे होईल,’ असे ही महिला असह्यपणे रडताना म्हणत आहे. आणखी एका महिलेने माहिती दिली की स्थानिक पोलिस तृणमूलचे काम करत असून भाजप कार्यकर्त्यांच्या घरचे पत्ते बाहेर काढत आहेत.

हा व्हिडिओ मूळतः टीव्ही ९ बांगलाच्या युट्युब चॅनलवर ३ जून २०२४ रोजी पोस्ट करण्यात आला होता. पीडित महिला ही पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली गावातील आहे. तिचा पती या वर्षी २ जूनपासून बेपत्ता आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जून २०२४ रोजी झाला होता.महिलेचा पती, जो भाजपचा पोलिंग एजंट होता, त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्ते घरातून पळून जात आहेत.

हे ही वाचा..

सुरत महानगरपालिकेच्या १३ मंदिरांना पाडण्याच्या नोटीसनंतर विहिंपकडून निदर्शनांचा इशारा!

विवान कारुळकरच्या पुस्तकाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली दखल

ईडीकडून बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त

अमोल किर्तीकारांची मागणी फेटाळत मतमोजणीच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार

निवडणुकीनंतर, शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गावे आणि घरे सोडून पळ काढला
राज्यातील २०२१ च्या विधानसभा निवडणुका आणि २०२३च्या पंचायत निवडणुकीची आठवण करून देणारी एक भीषण परिस्थिती सध्या उद्भवली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने ८ जून रोजी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात याला दुजोरा देण्यात आला आहे. प्रशांत हलदर नावाच्या भाजप कार्यकर्ता म्हणतो, ‘आमच्यासाठी निवडणुकीचा मोसम म्हणजे घर सोडण्याचा मोसम.’

बरुईपूरच्या विद्याधर पल्ली भागातील रहिवासी, हलदर आणि त्याचे कुटुंब लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मतदान केल्यानंतर घरातून पळून गेले. त्याने पत्नी आणि मुलांना नातेवाईकाच्या घरी पाठवले होते. त्याने इतर ५० जणांसह बरुईपूर येथील भाजप कार्यालयात आश्रय घेतला आहे. हलदर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, मला २०२१मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर आणि नंतर गेल्या वर्षी पंचायत निवडणुकीनंतर घर सोडण्यास भाग पाडले गेले.

‘या वर्षी एप्रिलमध्ये मी घरी परत येऊ शकलो, पण आता पुन्हा एकदा मी बेघर आहे. मला आणि माझ्या गावातील इतर कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी धमक्या आल्या, तरीही मी पक्षासाठी काम केले. मात्र, २ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर मी घर सोडले. मी नंतर ऐकले की माझ्या घराची तोडफोड करण्यात आली आहे,’ भाजप कार्यकर्त्याने खेद व्यक्त केला.६ जून रोजी, कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचारावर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा