31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

Google News Follow

Related

आंधळा मागतो एक डोळा, देवघर, जगाच्या पाठीवर, सर्जा, जेता, गोष्ट लग्नानंतरची, आरती, सरस्वती चंद्र, आनंद, मेरे अपने, तीन बहुरानियाँ, कोरा कागज अशा जवळपास अडीचशेपेक्षा अधिक हिंदी, मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ कलाकार रमेश देव यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. नुकताच त्यांचा ९३वा वाढदिवस कुटुंबियांनी साजरा केला होता.

त्यांच्या निधनामुळे हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रमेश देव यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर नॅशनल फिल्म आर्काइव्हने त्यांचे दैवाचा खेळ या चित्रपटातील जुने छायाचित्र शेअर करत त्यांना आदरांजली अर्पण केली. जीवनकला यांच्यासोबतचे ते छायाचित्र आहे. रमेश देव यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी वडिलांच्या निधनाची बातमी दिली. रमेश देव यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका रमेश देव यांनी तेवढ्याच समर्थपणे भूषविल्या. १९५१ला त्यांचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले ते पाटलाची पोर या चित्रपटातील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेद्वारे. १९५६मध्ये आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली. त्यानंतर १९६२ला आरती सिनेमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

हे ही वाचा:

अनिल देशमुख म्हणाले की, पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अनिल परब देत असत!

वाझेच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून थेट आदेश!

शिंदे स्पोर्ट्स, शरद पवार, सुधीर फडके आणि…

उज्ज्वल निकम म्हणतात, नितेश राणे प्रकरणाचा निष्कारण फुगा केला गेला!

 

२०१३ मध्ये त्यांना ११व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रमेश आणि सीमा देव ही जोडी चित्रपटांत तर लोकप्रिय ठरलीच पण चित्रपटांच्या बाहेरही त्यांचे पती-पत्नीचे अतूट नाते कौतुकाचा विषय होते. हे त्यांचे लग्नाचे ५९वे वर्ष होते. अजिंक्य देव, अभिनय देव ही त्यांची दोन मुले. दोघांनीही अभिनय क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटविला. आनंद या राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील त्यांची डॉक्टरची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यात सीमा देव यांनीही काम केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा