31 C
Mumbai
Monday, May 27, 2024
घरविशेषअवघ्या ७२ धावांत गारद होणे हे चांगले लक्षण नाही!

अवघ्या ७२ धावांत गारद होणे हे चांगले लक्षण नाही!

दिलीप वेंगसरकर यांनी मुलांना सुनावले

Google News Follow

Related

१२ वर्षाखालील मुलांच्या एजिस फेडरल इन्शुरन्स कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ३५ षटकांच्या सामन्यात एक संघ केवळ ७२ धावांत बाद होणे हे चांगले लक्षण नाही. तुम्हाला जर चांगले आणि वरच्या स्तरावरचे क्रिकेट खेळायचे असेल तर दीर्घ काळ खेळपट्टीवर राहून मोठ्या खेळी करणे, त्यासाठी स्टॅमिना आणि मनोनिग्रह या गोष्टीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी सांगितले.

या वयातच तुम्ही दोन-दोन दिवसांचे सामने खेळण्याला पसंती दिलीत तर तुमचा पाया भक्कम होईल असेही त्यांनी पुढे सांगितले. माहुल, चेंबूर यथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने ठाण्याच्या जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघावर ७ विकेट्सनी आरामात मात करून विजेतेपद पटकावले. प्रतिस्पर्धी संघाला ७२ धावांत गुंडाळत त्यांनी हे आव्हान केवळ १३.३ षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघाला अचिव्हर्स क्रिकेट अकादमीच्या शौनक गावडे (११ धावांत २ बळी) आणि अमेय महाडिक (१६ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीचा सामना करणे जड गेले. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा मानव पोकर (२३) आणि वेदांत आनंद (नाबाद १५) यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी पार निराशा केली आणि त्यांचा डाव २५.५ षटकांत ७२ धावांतच आटोपला. या आव्हानाचा पाठलाग करताना अचिव्हर्स क्रिकेट अकादमीने देखील २७ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या, मात्र अर्जुन संघवी (नाबाद ३२) आणि निषाद परब (नाबाद १५) या जोडीने चौथ्या विकेटसाठी ४६ धावांची अभेद्य भागी रचून संचाचा विजय साजरा केला.

हे ही वाचा:

आमदार किरण सरनाईकांच्या भावाच्या कारला अपघात, पाच जणांचा मृत्यू!

माजी निवडणूक आयुक्तांनी राजदीपची चांगलीच चंपी केली!

पॅलिस्टिनी समर्थन आंदोलनात दोन हजारांहून अधिक जणांना अटक!

सुषमा अंधारेंना घ्यायला आलेल्या हेलीकॉप्टरला महाडमध्ये अपघात

शौनक गावडे याची अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली, तर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अचिव्हर्सच्या लक्ष्य भोर (८ बळी) याला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब संघाच्या मानव पोकर याची निवड करण्यात आली. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईच्या रणजी संघाच्या निवड समितीचे सदस्य आणि माजी रणजीपटू व डावखुरे फिरकी गोलंदाज रवी ठाकर आणि समाजसेवक राहुल वाळुंज यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेत १२ संघांचा सहभाग होता आणि त्यांची चार गटात विभागणी करून प्रत्येक संघाला किमान दोन साखळी सामने खेळण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते.

 

संक्षिप्त धावफलक – जी.ए.ई.टी. स्पोर्ट्स क्लब – २५.५ षटकांत सर्वबाद ७२ (मानव पोकर २३, वेदांत आनंद नाबाद १५ ; शौनक गावडे ११ धावांत २ बळी, अमेय महाडिक १६ धावांत २ बळी) पराभूत वि. अचिव्हर्स क्रिकेट अकादमी – १३.३ षटकांत ३ बाद ७३ (अर्जुन संघवी नाबाद ३२, निषाद परब नाबाद १५).

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा