30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
घरविशेषआमदार किरण सरनाईकांच्या भावाच्या कारला अपघात, पाच जणांचा मृत्यू!

आमदार किरण सरनाईकांच्या भावाच्या कारला अपघात, पाच जणांचा मृत्यू!

अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ घडली दुर्घटना

Google News Follow

Related

अकोल्यामध्ये भीषण अपघात घडला आहे.शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला आहे.अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झाला.या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाला. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील पुलाजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली.दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.या कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते.

हे ही वाचा:

ऑनलाईन फसवणुकीसाठी गुन्हेगार लढवत आहेत नवी शक्कल!

‘सीबीआय’ भारतीय संघराज्याच्या नियंत्रणाखाली नाही

पाकिस्तानातील सिंधी समाज करणार ‘राम लल्लाचा जयघोष’

पॅलिस्टिनी समर्थन आंदोलनात दोन हजारांहून अधिक जणांना अटक!

या अपघातात किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच शिवाजी आमले (वय ३०) सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५), तसेच एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहे. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा