गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.बहुतेक कंपन्या तसेच संस्थांनी मजबूत तपासणी आणि सुरक्षा यंत्रणा अवलंबली असूनही सायबर गुन्ह्यांमध्ये अधिक भर पडली आहे.सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहेत.दरम्यान, बेंगळुरूस्थित टेक उद्योजक अदितीने अशीच एक नवीन युक्ती शेअर केली आहे, जी गुन्हेगार पैसे चोरण्यासाठी वापरत आहेत.
आदितीने ट्विटरवर लांबलचक पोस्ट लिहून आपला अनुभव शेअर केला.तिने लिहिले की, ऑनलाईन फसवणुकीपासुन मी कशी-बशी वाचली, ज्यामध्ये एसएमएसचा वापर करून गोंधळ निर्माण केला जातो आणि शेवटी पैसे चोरले जातात.तिने पोस्ट मध्ये लिहिले की, मी ऑफिसच्या कामात व्यस्त असताना अचानक मला एका वृद्ध व्यक्तीचा कॉल आला आणि त्याने सांगितले की, तिच्या वडिलांना पैसे पाठवायचे आहेत.मात्र, वडिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होत नसल्याने तिच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करत असल्याचे त्याने सांगितले.त्यानंतर थोड्याच वेळाने तिला पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला.
हे ही वाचा:
‘सीबीआय’ भारतीय संघराज्याच्या नियंत्रणाखाली नाही
पाकिस्तानातील सिंधी समाज करणार ‘राम लल्लाचा जयघोष’
पॅलिस्टिनी समर्थन आंदोलनात दोन हजारांहून अधिक जणांना अटक!
प्रज्वल रेवण्णा यांच्याकडे होता डिप्लोमॅटिक पासपोर्ट!
यानंतर वृद्धाने आदितीला सांगितले की, ३,००० रुपये पाठवायचे होते मात्र चुकून ३०,००० हजार रुपये पाठवले.उर्वरित रक्कम परत पाठविण्याची विनंती त्याने तरुणीकडे केली.तथापि, तिला मिळालेल्या एसएमएस अलर्टचे परीक्षण केल्यावर, अदितीला विसंगती लक्षात आल्या आणि तिला समजले की ती आर्थिक घोटाळ्याला बळी पडण्याच्या मार्गावर आहे.यानंतर तिने लगेच आपल्या खात्यावर जाऊन लगेच बँक बॅलन्स चेक केला आणि फसवणुकीला बळी पडण्यापासून बचावले.बँक बॅलन्स चेक केला तेव्हा कोणतीही रक्कम खात्यात जमा झाली नव्हती,असे तिने सांगितले.
मी एका मिनिटात पुन्हा त्या नंबरवर कॉल केला होता.मात्र, मला तेव्हा ब्लॉक करण्यात आले होते. परंतु, पैसे जमा झाल्याचा मेसेज इतका हुबेहूब होता की कोणाचीही फसवणूक होईल.तिने पुढे सांगितले की, अशा गोष्टींपासून सावध राहिले पाहिजे, आपल्या खात्यावर अशी कोणती रक्कम जमा झाली असेल तर आपण पहिला बँक बॅलन्स चेक करणे गरजेचे आहे, कोणत्याही एसएमएसवर विश्वास ठेवू नका.कारण गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी नवनवीन तंत्राचा वापर करत आहेत, असे आदितीने सांगितले.