30 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरविशेष'मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन'

‘मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही, स्वातंत्र्य मिळवणार असे म्हणणाऱ्या नेताजींना नमन’

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजींच्या डिजिटल पुतळ्याचे अनावरण

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातला भारत उभा करण्यासाठी आपण झटायचे आहे. कॅन डू, विल डू हा नेताजींचा प्रेरणादायी संदेश आपण लक्षात ठेवायचा आहे. नेताजी म्हणत असत स्वतंत्र भारताच्या स्वप्नाचा विश्वास हरवू नका. अशी कोणतीही ताकद नाही, जी भारताला रोखू शकेल. स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होण्याआधी म्हणजेच २०४७च्या आधी नव्या भारताच्या निर्मितीचे आपले लक्ष्य आहे. देशावर नेताजींचा जो विश्वास होता, त्यांच्या मनात जी देशाप्रती भावना होती त्यानुसार भारताची उभारणी आपल्याला करायची आहे. जगातली कोणतीही ताकद भारताला या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापासून थांबवू शकणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

नवी दिल्लीतील इंडिया गेटसमोर नेताजी सुभाष यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याची एक डिजिटल प्रतिमा तोपर्यंत तिथे उभी करण्यात आली आहे. त्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, भारत मातेचे सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त मी कोटी कोटी नमन करतो. हा कालखंड ऐतिहासिक आहे. हे स्थान जिथे आज आपण एकत्र आलो आहोत तेही ऐतिहासिक आहे. लोकशाहीचे प्रतीक संसद जवळच आहे, क्रियाशिलतेचे प्रतीकही जवळ आहेत. वीर शहिदांना समर्पित राष्ट्रीय युद्ध स्मारकही जवळ आहे. इंडिया गेटवर अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. नेताजींना आदरपूर्वक श्रद्धांजली देत आहोत. स्वाधिन व सार्वभौम भारताचा विश्वास नेताजींनी आम्हाला दिला. अत्यंत आत्मविश्वासाने, बाणेदारपणे इंग्रजी सत्तेला त्यांनी सांगितले होते की, मी स्वातंत्र्याची भीक स्वीकारणार नाही मी ते मिळवणारच, असे ते म्हणाले. त्यांनी भारताच्या धरतीवर आझाद सेना स्थापित केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागच्या वर्षापासून नेताजींच्या जयंतीदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. आज पराक्रम दिवसाच्या निमित्ताने सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारही दिले जात आहेत. नेताजींच्या जीवनापासून प्रेरणा घेऊनच हे पुरस्कार दिले जात आहे. या पुरस्काराने सन्मानित विजेत्यांचे अभिनंदन!

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशाच्या विकासाचा प्रवास प्रदीर्घ आहे. अनेक शिखरे पादाक्रांत करायची आहेत. देशाच्या इतिहासाला आकार देणाऱ्यांची स्मृती जिवंत राहायला हवी. हे दुर्भाग्य होते की अनेकांच्या स्मृती, योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी तपस्या केली. स्वातंत्र्यचळवळीत अनेकांची तपस्या आहे पण त्यांचा इतिहास लपवला गेला. पण स्वातंत्र्य मिळून काही दशके लोटल्यावर या चुका  सुधारल्या जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित पंचतीर्थांना विकसित करत आहोत, स्टॅच्यू ऑफ युनिटी जगभरात लोकप्रिय आहे, बिरसा मुंडा जंयती जनजाती गौरव दिवस म्हणून सुरू करण्यात आला. आदिवासी इतिहास जपण्यासाठी विविध राज्यात म्युझियम्स बनवली जात आहे. नेताजींच्या सर्व आठवणी सन्मानाने जतन केल्या जाणार आहेत. नेताजींनी अंदमानमध्ये तिरंगा फडकावला त्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अंदमानातील एका द्विपाला नेताजींचे नाव दिले आहे. अंदमानमध्ये एक विशेष संकल्प स्मारक त्यांना समर्पित केले आहे. सेनादलातील जवानांनाही ती श्रद्धांजली आहे.

मोदींनी सांगितले की, कोलकाताला मला नेताजींच्या घरात जाण्याची संधी मिळाली. जिथे ते अभ्यास करत, त्यांचे घर, भिंती यांचे दर्शन करणे शब्दांपलिकडे आहे. २१ ऑक्टोबर २०१८ चा दिवस मी विसरू शकत नाही. आझाद हिंद सेनेला ७५ वर्षे झाली. आझाद हिंदची टोपी घालून मी तिरंगा फडकाविला होता. तो क्षण अविस्मरणीय होता. लाल किल्ल्यावरही आझाद हिंदशी संबंधित एक स्मारकही उभे राहत आहे. २६जानेवारीच्या परेडमध्ये आझाद हिंद सेनेतील माजी सैनिकांना बघून मन प्रफुल्लित झाले. केंद्र सरकारने नेताजींशी संबंधित फाइल्स सार्वजनिक केल्या. नेताजी काही निश्चय करत तेव्हा कोणती ताकद रोखू शकत नव्हती. कॅन डू, विल डू हा त्यांचा संदेश लक्षात ठेवूया. राष्ट्रवाद आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. सृजनही करायचे आहे. नेताजींच्या स्वप्नातला भारत उभा करायचा आहे. त्यात आपण यशस्वी होऊ.

हे ही वाचा:

निवडणूक मतचाचण्यांनी फोडला समाजवादी पक्षाला घाम

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारांची घोषणा

….म्हणून गावकरी २४ तास देत आहेत झाडाजवळ पहारा!

…म्हणून या उमेदवाराला करायचे आहे निवडणुकीतील पराभवाचे शतक!

 

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनात झालेल्या आमूलाग्र बदलांची दखल घेतली. जागतिक स्तरावर भारत आज आपत्ती व्यवस्थापनात सक्षम झाला असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, देशात आपत्ती व्यवस्थापनाची अवस्था तहान लागली की विहीर खोदणे या म्हणीप्रमाणे होती. आपत्तीचा विषय हा शेतीविषयक विभागाकडे होता. पूर, पाऊस, याच्यावर उपाययोजना शेतीवर अवलंबून होत्या. पण २००१मध्ये गुजरातमध्ये भूकंप आल्यावर जे काही झाले त्यामुळे देशाला नव्या पद्धतीने विचार करावा लागला. आपत्ती व्यवस्थापनाचे चित्र बदलले. आम्ही सगळ्या विभागांना कामाला जुंपले. त्या अनुभवातून शिकून २००३मध्ये गुजरात स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट तयार केला गेला. प्रथमच असा कायदा झाला. मग केंद्राने गुजरातकडून २००५मध्ये देशभरात असा कायदा आणला.

या कायद्यानंतर राष्ट्रीय डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी तयार झाली. याला प्रभावी बनवियासाठी २०१४पासून आमच्या सरकारने चौफेर कामगिरी केली आहे. कोरोनाचा विचार केला तर त्या महामारीतही नव्या आपत्ती देशासमोर आल्या. भूकंप आले, पूर आले, ओडिसा, प बंगाल चक्रीवादळे आली. महाराष्ट्र गोवा इथेही चक्रीवादळे आली. प्रथम अनेकांचे  अशा आपत्तीत मृत्यू होत. देशाने प्रत्येक आव्हानाचा सामना नव्या ताकदीने दिला. यामुळेच या आपत्तीत जीवन वाचवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या या बदलाचे कौतुक केले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा