28.8 C
Mumbai
Thursday, August 6, 2026
घरविशेषमेहबुबा मुफ्तींनी धरला तिरंगा उलटा

मेहबुबा मुफ्तींनी धरला तिरंगा उलटा

कायदेशीर कारवाईची शक्यता

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP)च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती या श्रीनगरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रीय ध्वज उलटा पकडला. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने ध्वजसंहितेच्या उल्लंघनाप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुरू केला आहे.

मेहबुबा मुफ्ती यांनी कलम ३७० आणि कलम ३५अ रद्द करण्याच्या निर्णयाच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त श्रीनगरमधील पीडीपी कार्यालयाबाहेर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान त्यांच्या हातात भारतीय तिरंगा आणि जम्मू-काश्मीर राज्याचा पूर्वीचा ध्वज होता. मात्र, त्यांच्या हातात भारतीय तिरंगा हा उलटा दिसत आहे. यामुळे त्या टीकेच्या धनी बनल्या आहेत.

घटनेनंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून, ध्वजसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक स्तरावर कायदेशीर कारवाईचा पर्यायही विचाराधीन आहे. या घटनेनंतर मेहबुबा मुफ्ती यांच्यावर राजकीय टीका सुरू झाली आहे.

ध्वजसंहिता काय सांगते?

भारतीय ध्वजसंहितेनुसार, राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन ठरावीक नियमांनुसारच करणे बंधनकारक आहे. तिरंगा फडकवताना किंवा हातात धरताना सर्वात वर केशरी रंग, मध्यभागी पांढरा रंग आणि त्यावर २४ आऱ्यांचे निळ्या रंगाचे अशोकचक्र, तर सर्वात खाली हिरवा रंग असणे आवश्यक आहे. ध्वज उलटा धरणे, चुकीच्या प्रमाणात वापरणे किंवा खराब अवस्थेतील ध्वज प्रदर्शित करणे हे ध्वजसंहितेचे उल्लंघन मानले जाते.

हे ही वाचा:

ई-२० वादातील गडकरींशी संबंधित डीपफेक, बनावट पोस्ट हटवा

‘मेटा’कुटीला…माफी मागा नाहीतर कारवाई

तीन महिन्यात १००० पेक्षा अधिक जहाजांनी ओलांडली होर्मुझ

रेपो दर सलग पुन्हा ५.२५ टक्क्यांवर कायम

दरम्यान, कलम ३७० रद्द करण्याच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त जम्मू-काश्मीर पोलिसांनी यापूर्वीच सार्वजनिक सूचना जारी करून प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही आंदोलन, मोर्चा, निदर्शने किंवा सार्वजनिक सभा घेण्यास मनाई केली होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला होता. तसेच शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा