शनिवारी (१७ मे) संध्याकाळी २७७ प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे एक जहाज न्यू यॉर्क शहरातील ब्रुकलिन ब्रिजवर कोसळले. या अपघातात किमान दोन जणांचा मृत्यू झाला आणि १९ जण जखमी झाले, ज्यात दोघांची प्रकृती गंभीर आहे, असे न्यू यॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी सांगितले. जहाजातील सर्व जखमींची नोंद झाली आहे, तर अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे वृत्त आहे.
न्यू यॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम्स ट्वीटकरत म्हणाले, या अपघातात १९ जण जखमी झाले आहेत, दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जहाजावर एकूण २७७ प्रवासी होते. तथापि, या अपघातात १४२ वर्षे जुन्या पुलाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. या अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, अपघात होण्यापूर्वीचा नेमका क्षण कैद झाला आहे.
अपघातानंतर ब्रुकलिन ब्रिज काही काळ बंद होता, परंतु रात्री १०:३० वाजता तो पुन्हा उघडण्यात आला. “पुलाच्या संरचनेचे कोणतेही नुकसान झाले नाही परंतु चौकशी सुरूच राहील,” असे महापौरांचे प्रवक्ते फॅबियन लेव्ही म्हणाले. न्यू यॉर्क अग्निशमन विभागाने सांगितले की, सध्या बचाव कार्य सुरू आहे. ‘कुआह्तेमोक’ हे मेक्सिकन नौदलाचे प्रशिक्षण जहाज आहे. ते १५ देशांमधील २२ बंदरांना भेट देणार होते. हे प्रशिक्षण जहाज न्यू यॉर्क हार्बरहून निघत असताना ही घटना घडली.
हे ही वाचा :
भारतविरुद्ध जाणे बांग्लादेशसाठी योग्य नाही
सरस्वती विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना कलमा म्हणायला लावला, मुस्लीम शिक्षिकेची हकालपट्टी!
पंजाबमध्ये आप सरकारविरोधात आक्रोश
“पाकिस्तानमध्ये असे काहीही नाही जे भारतीय सैन्याच्या आवाक्याबाहेर आहे”
दरम्यान, १८८३ मध्ये बांधलेला हा झुलता पूल केवळ न्यू यॉर्कची ओळख नाही तर भारतीय चित्रपटांमध्येही त्याला एक विशेष स्थान मिळाले आहे. ‘कल हो ना हो’ मध्ये शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांचा रोमँटिक वॉक दाखवण्यासाठी आणि ‘कभी अलविदा ना कहना’ मध्ये न्यू यॉर्क दाखवण्यासाठी या पुलाची भव्यता पडद्यावर दिसून आली.
