30 C
Mumbai
Saturday, December 7, 2024
घरविशेषराज्यातील साडेतीन लाख युवक-युवतींना मिळणार 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' !

राज्यातील साडेतीन लाख युवक-युवतींना मिळणार ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ !

'शाळकरी मुलींना सक्षम बनवण्यासाठी' सरकारचा अनोखा उपक्रम

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त राज्यातील युवक-युवतींना सक्षम करण्यासाठी राज्यसरकारच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येणार असून हा उपक्रम ३ ते १५ जुलै दरम्यान राज्यात राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये साधारणतः ३,५०,००० युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण देणाऱ्या शिबिराचे आयोजन करणार असल्याची माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा यांनी दिली.हा उपक्रम ‘राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण’ म्हणून राबवण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री लोढा यांनी दिली.

राज्यात महिला व मुलींच्या होणाऱ्या निर्घृण हत्या व हिंसाचार ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. व त्यावर करावे लागणारे उपाय योजना ही शासनाची नियोजनाची अत्यावश्यक बाब झालेली आहे. अलीकडे काळात महिला व मुलीवर होणारे क्रूर हिंसाचार व त्यातून केली जाणारी त्यांची हत्या हे शासनासमोरील व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. यास आळा बसवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे खूपच आवश्यक आहे. शाळकरी व महिला विद्यालयीन तरुण-तरुणी यांचे जीवन शैली तंत्रज्ञाने खूपच बदलली आहे व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या पूर्ण तरुण पिढीला वाम मार्गावर नेत आहे.

हे ही वाचा:

महिलांनी नऊवारीत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन!

चीनने जे आज पेरलंय तेच उद्या तिथे उगवेल!

मणिपूरमध्ये कुटुंबाच्या रक्षणासाठी गावकऱ्यांनी उचलले शस्त्र; बंकरमध्ये वास्तव्य

योग ही भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी!

यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबत आयुक्त महिला व बाल विकास या कार्यालयामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने दिनांक ३ ते १५ जुलै दरम्यान करण्यात येत आहे. महाविद्यालयीन युवतींसाठी तालुकास्तरावर विद्यापीठांच्या मदतीने या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रथमता युवतींचे मनोबल उंचवण्यासाठी तीन दिवसीय शिबिर घेण्यात येईल. पहिल्या दिवशी महिला व मुलींवरील हिंसाचार संकल्पना व सद्यस्तिथी दाखवण्यात येईल.तसेच नवीन पिढीला तंत्रज्ञानापासून असलेले धोक्याचे मार्गदर्शन देण्यात येईल.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलींना आपल्या बचावासाठी संरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येईल व शेवट तिसऱ्या दिवशी प्रात्यक्षिक / सराव त्यांच्याकडून करून घेण्यात येईल. या तीन दिवसांच्या शिबिरानंतर ज्या युवतींना अधिक संरक्षणाच्या प्रशिक्षणात रुची असेल, अशा युवतींची संख्या लक्षात घेऊन त्या दृष्टीने पुढील पंधरा दिवसीय संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विभागामार्फत करण्यात येईल. राज्यात महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावर व्यावसायिक तत्त्वावर सर्व विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट, ”भारतीय स्त्री शक्ती संस्था” यांचे सोबत आवश्यकतेनुसार सामंजस्य करार करतील.

महिलांसाठी संरक्षण प्रशिक्षण देणारी ‘भारतीय स्त्री संस्था’ निशुल्क काम करणार आहे. भारतीय स्त्री संस्था महाराष्ट्रभर फिरून ३,५०,००० युवतींना सक्षम बनवण्याच काम करणार आहे. या शिबिरात १५ ते २५ या वयोगटातील मुलं-मुलीं सामील होऊ शकतात. महाराष्ट्रातील सर्व मुलींनी हिंसाचारविरुद्ध लढण्यासाठी सक्षम बनण्यासाठी मुलां-मुलींनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आव्हान , मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांनी केले.

तसेच आज मुंबई विद्यापीठ, एस. एन.डी. टी., भारतीय स्त्री शक्ती संस्‍था आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला असल्याचे मंत्री यांनी सांगितले.या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये ४० लाख बालक,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उस्फूर्तपणे योग दिवस साजरा केला असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
209,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा