34 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरविशेषमिझोराममधील पहिली बैराबी-सायरंग रेल्वे झाली एका वर्षाची

मिझोराममधील पहिली बैराबी-सायरंग रेल्वे झाली एका वर्षाची

प्रवास, व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०२५ रोजी ५१.३८ किलोमीटर लांबीच्या बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे आणि सैरांग रेल्वेस्थानकाचे उद्घाटन झाले आणि मिझोरामच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. काँग्रेसच्या काळात मिझोराममध्ये रेल्वे पोहोचली नाही पण मोदी सरकारच्या काळात सुरू झालेल्या या रेल्वेमुळे या दुर्गम डोंगराळ राज्याच्या विकासाला मोठी गती प्राप्त झाली. या रेल्वेला या १३ सप्टेंबर २०२६ला एक वर्ष पूर्ण झाले. रेल्वे नकाशावरील केवळ एक मार्ग न राहता तो प्रवास सुलभ करणारा, बाजारपेठांपर्यंत पोहोच वाढवणारा, पर्यटनाला चालना देणारा आणि नव्या संधींचे प्रवेशद्वार ठरला आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील एक व्हीडिओ एक्सवर पोस्ट करत या रेल्वेला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

मिझोरामच्या आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीमुळे पिढ्यान्‌पिढ्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिकांना मुख्यतः रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे प्रवासासाठी मोठा वेळ लागत असे आणि तो अनेकदा गैरसोयीचा व अनिश्चित ठरत असे. बैराबी-सैरांग नव्या रेल्वेमार्गाच्या कार्यान्वयनामुळे ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. या रेल्वेमार्गाचे बांधकाम हे अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण मानले जात आहे. उंच डोंगर, खोल दऱ्या आणि अवघड दर्‍यांमधून हा रेल्वेमार्ग जातो. या प्रकल्पात एकूण १५३ पूल आहेत. त्यापैकी ५५ मोठे पूल, ८८ छोटे पूल आणि १० उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

सौदीची ईस्ट-वेस्ट पाइपलाइन ड्रोन हल्ल्यानंतर बंद

मानवजातीचा नाश टाळायचा असेल तर ‘एआय’चा वेग करा कमी!

पंजाबमध्ये गायक गुलाब सिद्धू यांच्या घरावर तुफान गोळीबार

झोमॅटोची कॅश ऑन डिलिव्हरीही आता महागणार

यातील सहा पुलांची उंची ७० मीटरपेक्षा अधिक आहे. सर्वाधिक उंच पूल तब्बल ११४ मीटर उंच आहे. हा पूल दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षा सुमारे ४२ मीटर उंच आहे. या रेल्वेमार्गावर जवळपास १६ किलोमीटर लांबीचे ४५ बोगदे आहेत. बैराबीपासून पुढे राष्ट्रीय रेल्वे जाळ्याला हॉर्तोकी, कावनपुई, मुआलकांग आणि अखेरीस सैरांग या चार नव्याने विकसित स्थानकांशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे मिझोरामची राजधानी ऐझॉलच्या अगदी जवळपर्यंत रेल्वे पोहोचली आहे.

प्रवासी वाहतुकीला मोठी चालना

सैरांगहून आता गुवाहाटी, कोलकाता आणि दिल्ली या प्रमुख शहरांशी थेट लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरू झाल्या आहेत. सैरांग-अनंद विहार राजधानी एक्स्प्रेसमुळे मिझोरामला प्रथमच देशाच्या राजधानीशी थेट उच्च दर्जाची रेल्वे जोडणी मिळाली. गुवाहाटी आणि कोलकाता सेवांमुळे शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय सुविधांसाठी महत्त्वाच्या केंद्रांशीही विश्वासार्ह संपर्क निर्माण झाला.

याशिवाय जानेवारी २०२६ मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या सैरांग-सिलचर प्रवासी रेल्वे सेवेमुळे मिझोरामचा आसाममधील बराक खोऱ्याशी नियमित रेल्वे संपर्क निर्माण झाला आहे. या रेल्वे सेवांमधून १५ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक फेरीत रेल्वेगाड्यांची प्रवासी क्षमता १०० टक्क्यांहून अधिक राहिली आहे. सैरांग-कोलकाता आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या रेल्वेची सरासरी प्रवासी क्षमता वापर १४० टक्क्यांहून अधिक राहिला. सैरांग-गुवाहाटी दररोजच्या सेवेत हा आकडा ११० टक्क्यांहून अधिक, तर सैरांग-अनंद विहार राजधानी एक्स्प्रेसमध्ये सरासरी १४५ टक्क्यांहून अधिक राहिला. या रेल्वे सेवांमधून भारतीय रेल्वेला आतापर्यंत ५४ कोटी रुपयांहून अधिक तिकीट महसूल मिळाला आहे.

सैरांग स्थानकावर ५ लाख प्रवासी

गेल्या एका वर्षात सैरांग रेल्वेस्थानकावर ५.५४ लाखांहून अधिक प्रवासी ये-जा झाली आहे. दररोज सरासरी सुमारे ३३०० प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. बैराबी-सैरांग रेल्वेमार्गामुळे मिझोराममधील मालवाहतुकीचे चित्रही बदलले आहे. जीवनावश्यक वस्तू, वाहनं आणि बांधकाम साहित्य सुरक्षित, वेळेवर आणि तुलनेने कमी खर्चात ऐझॉलपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. नव्या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी पहिली मालगाडी सैरांग येथे पोहोचली. गुवाहाटीजवळील टेटेलिया येथील सिमेंट केंद्रातून २६ हजारांहून अधिक सिमेंटच्या पोत्यांची वाहतूक या गाडीने केली.

दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी आणि सिलचर येथून थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यामुळे देशातील इतर भागांतील पर्यटकांसाठी मिझोरामपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ झाले आहे. पूर्वी केवळ विमानप्रवास किंवा दीर्घ रस्ते प्रवासावर अवलंबून राहावे लागत होते. आता रेल्वेमुळे तुलनेने परवडणारा प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा