29 C
Mumbai
Friday, September 18, 2026
घरविशेषगणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

१७ हजारांहून अधिक पोलिस तैनात

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी सुरक्षित आणि निर्भय वातावरणात सण साजरा करावा, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. उत्सवाच्या कालावधीत ७ अतिरिक्त पोलिस आयुक्त, ३७ पोलिस उपायुक्त, ५२ सहायक पोलिस आयुक्तांसह २,६५० अधिकारी आणि १४,१५० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफच्या तुकड्या, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT), दंगल नियंत्रण पथके आणि होमगार्ड यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी गर्दी आणि सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे.
हे ही वाचा:
आयआरसीटीसीकडून एका दिवसात २० लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांची विक्री

सौदीची ईस्ट-वेस्ट पाइपलाइन ड्रोन हल्ल्यानंतर बंद

“आणीबाणी लावून सरकार चालवण्याची आमची नाही काँग्रेसची संस्कृती”

उत्तर प्रदेशात अल-कायदाच्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्याला अटक

गणेशोत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी संयम बाळगावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. तसेच कोणतीही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याला हात न लावता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तातडीच्या पोलिस मदतीसाठी नागरिकांनी १०० किंवा ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा