29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषकाल्का शिमला रेल्वे मार्गावर बर्फाचे पांघरूण

काल्का शिमला रेल्वे मार्गावर बर्फाचे पांघरूण

Google News Follow

Related

सध्या सगळीकडे थंडीचीच चर्चा होताना दिसत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातही दिवसागणिक तापमानाचा पारा खाली येताना दिसत आहे. या कुडकुडणाऱ्या थंडीत एकीकडे लोकं स्वेटर, जॅकेट घालून, शेकोटीची उब घेताना दिवत आहेत. तर दुसरीकडे मात्र या हिवाळ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी झालेली बर्फ़वृष्टी डोळ्याचे पारणे फेडताना दिसत आहे.

ठिकठिकाणी झालेल्या बर्फवृष्टीमुळे जमिनीवर पांढरी चादर पसरल्याचा भास अनेक ठिकाणी होताना दिसत आहे. अशी ही बर्फवृष्टी कायमच एक आकर्षण बिंदू ठरते. जागोजागी पसरलेली ही बर्फाची चादर पर्यटकांना आकर्षित करत आहे.भारतात उत्तरेकडच्या काही तराज्यांमध्ये अशा प्रकारची बर्फवृष्टी अनुभवता येते. ज्यामध्ये काश्मीर, शिमला, कुलू-मनाली, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेशचा काही भाग ही सर्वच ठिकाणे अशा प्रकारच्या बर्फवृष्टीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांच्या यादीत फार वरती असतात.

हे ही वाचा:

रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात पोलीस तक्रार

‘मंत्रालयात माझा फोटो काढणारा उद्धव ठाकरेंचा निकटवर्ती?’

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन

कर्जतच्या जमिनीशी उद्धव ठाकरे यांचा संबंध सोमय्या करणार उघड…

गुरुवार, २७ जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असेच काही नयनरम्य फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. कालका शिमला रेल्वे सेक्शन येथील हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये सर्वत्र झालेली बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. रेल्वे ट्रॅकवर सर्वत्र बर्फ पसरला आहे. तर आजूबाजूच्या सर्व झाडांनीही बर्फ़ाची चादर पांघरल्याचे भासत आहे. तर रेल्वे स्टेशनवरही सर्वत्र बर्फ पसरला आहे. हे फोटो नेटकऱ्यांना खूपच पसंत पडले असून भारताचे सौंदर्य ता फोटोंमधून झळकताना दिसत आहे. या आधी भारतीय रेल्वे मंत्रालयातर्फे त्यांच्या अधिकृत समाज माध्यमांवरील खात्यांवरून हे फोतो शेअर केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा