29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरअर्थजगतगतवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही डिजिटल बजेट..

गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही डिजिटल बजेट..

Google News Follow

Related

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२२ ला आर्थिक वर्ष २०२२-२३ चे बजेट सादर करणार आहेत. मात्र, कोरोनाचे संकट अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी बजेट डिजिटल स्वरूपातच सादर केले जाणार आहे.

अर्थव्यवस्थेचा कर प्रस्ताव आणि आर्थिक स्टेटमेंटच्या सादरीकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे छापली जाणार नाहीत. म्हणजेच यावेळीही तुम्हाला बजेट फक्त डिजिटल स्वरूपात मिळणार आहे.  यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०२१-२२ च्या पपेरलेस बजेट सादरीकरणासाठी एक अँप तयार करण्यात आले होते.

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून बजेटच्या प्रतींची छपाई कमी झाली आहे. सुरुवातीला, पत्रकार आणि बाह्य विश्लेषकांना वितरित केलेल्या प्रती कमी केल्या गेल्या आणि नंतर महामारीचा हवाला देत लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना दिलेल्या प्रती कमी करण्यात आल्या. बजेटची कागदपत्रे बहुतांशी डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतील. फक्त काही प्रती प्रत्यक्ष उपलब्ध असतील. बजेट दस्तऐवजाच्या शंभर प्रती छापल्या गेल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साथीच्या आजारामुळे पारंपारिक हलवा समारंभही रद्द करण्यात आला आहे. तथापि, बजेट दस्तऐवजांचे संकलन डिजीटल करण्यासाठी, कर्मचार्‍यांच्या एका लहान गटाला उपस्थित राहावे लागेल.

हे ही वाचा:

समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

पाकिस्तानमध्ये घरबसल्या मिळते AK- 47

आता ग्रुप एडमिन ठरणार ‘राजा’

आता कारने उडत उडत प्रवास करता येणार!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत टीव्ही सोमनाथन, तरुण बजाज, अजय सेठ, देबाशीष पांडा, तुहिन कांत, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम अर्थसंकल्प तयार करण्यात ही संपूर्ण टीम गुंतलेली आहे.

यामध्ये टीव्ही सोमनाथन यांच्याकडे वित्त मंत्रालयात खर्च सचिवाची जबाबदारी आहे.  IAS अधिकारी तरुण बजाज हेवित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव आहेत. अजय सेठ यांच्याकडे भारताची जीडीपी वाढ टिकवून ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेत खाजगी भांडवली खर्चाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम यांच्याकडे आहे. IAS अधिकारी देबाशीष पांडा हे वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात सचिव आहेत. तसेच, IAS अधिकारी तुहिन कांत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव आणि कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी आर्थिक अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा