29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरविशेषटीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटपटूंवर पैशांचा वर्षाव

टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटपटूंवर पैशांचा वर्षाव

Google News Follow

Related

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडवर ४-१ अशी मात केली. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी भारताने मालिकेतील सर्वात मोठा विजय नोंदविला आहे. इंग्लंडला एक डाव आणि ६४ धावांनी दारुण पराभवाची चव चाखावी लागली. भारताच्या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे की, बोर्ड आता ‘टेस्ट क्रिकेट इन्सेंटिव स्कीम’ सुरू करणार आहे. या घोषणेमुळे कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना त्याचा खूप फायदा होणार आहे.

कसोटीपटूंना बंपर लॉटरी

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या नव्या योजनेची घोषणा करताना लिहिले की, “मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की पुरुष क्रिकेट संघासाठी ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू केली जात आहे. यामुळे आमच्या खेळाडूंना अधिक आर्थिक मदत मिळेल. ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ २०२२-२०२३ च्या हंगामापासून वैध असेल. या योजनेअंतर्गत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी १५ लाख रुपये शुल्क देण्यात येणार असून आणखी एक बक्षीसही देण्यात येणार आहे.

I am pleased to announce the initiation of the ‘Test Cricket Incentive Scheme’ for Senior Men, a step aimed at providing financial growth and stability to our esteemed athletes. Commencing from the 2022-23 season, the ‘Test Cricket Incentive Scheme’ will serve as an additional reward structure on top of the existing match fee for Test matches, set at INR 15 lakhs.

  • jay shah (@jayshah)

 

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना एका सामन्यासाठी १५ लाख रुपये फी मिळते. पण आता या खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळण्याची संधी मिळणार आहे. जर एखादा खेळाडू संपूर्ण मोसमात ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळत असेल तर त्याला प्रोत्साहन म्हणून प्रत्येक सामन्यासाठी ४५ लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. दुसरीकडे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंना २२.५ लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.

हेही वाचा :

बोरीवलीतील रिक्षा चालकांचे हे चाललंय काय?

अश्विनची १०० नंबरी चमक, भारताने इंग्लंडला गारद करत मालिका जिंकली

‘सिक्सर किंग’ रोहित शर्माने केली धोनीची बरोबरी

श्रीनगर विमानतळावर मोदींना भेटलेल्या ‘त्या’ व्यक्तीची चर्चा

जर एखादा खेळाडू ५० टक्के सामने खेळला तर त्याला प्रत्येक सामन्यामागे ३० लाख रुपये आणि प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक सामन्यामागे १५ लाख रुपये दिले जातील. जर एखादा खेळाडू संपूर्ण मोसमात ५० टक्क्यांपेक्षा कमी सामने खेळत असेल तर त्याला कोणतेही प्रोत्साहन दिले जाणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा