33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषम्युकरमायकॉसिसचा समावेश साथ रोग नियंत्रण कायद्यात समावेश

म्युकरमायकॉसिसचा समावेश साथ रोग नियंत्रण कायद्यात समावेश

Google News Follow

Related

संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेले असतानाच म्युकरमायकॉसिसने देखील डोके वर काढले आहे. हा बुरशीचा आजार कोविड रुग्णांमध्ये वेगाने फोफावू लागला आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आजारासाठीही साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू केला आहे.

देशात म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी या आजाराची रुग्णसंख्या वेगानं वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकार कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस या आजाराचाही आता साथीचे रोग नियंत्रण कायद्यात समावेश करणार आहे. त्यामुळे साथीचे रोग नियंत्रण कायद्याचे सर्व नियम आता याही आजारासाठी लागू होतील. देशाच्या आरोग्य मंत्रालयानं आज सर्व राज्य सरकारांना याबाबतचा आदेश जारी केला आहे.

हे ही वाचा:

कांदिवली पूर्व येथे आमदार अतुल भातखळकरांच्या प्रयत्नांतून ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र

केंद्र सरकारची प्रणाली असताना राज्याचा ‘जिरायती’ खर्च कोणासाठी?

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा राहुल द्रविडकडे

रुग्णाच्या मृत्यनंतरही ३ दिवस उपचार सुरु, नांदेडमधील धक्कादायक प्रकार

म्युकरमायकोसिससाठीही आता साथ नियंत्रण कायदा लागू

  • साथीचे रोग नियंत्रण कायदा (१८९७) अंतर्गत आता म्युकरमायकोसिस हा लक्षणीय आजार म्हणून समावेश होणार आहे.
  • सर्व राज्य सरकारं, खासगी हॉस्पिटल्स यांना आजाराच्या चाचणीबाबत, उपचाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरनं दिलेल्या मार्गदर्शक सुचना बंधनकारक राहणार आहेत.
  • सर्व संशयित, आजारी रुग्णांच्या केसेस केद्रीय आरोग्य मंत्रालयाला कळवणं बंधनकारक असेल.
  • साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू झाल्यानंतर केंद्राला अंमलबजावणीसाठी विशेष अधिकार प्राप्त होतात.
  • ब्रिटीशांनी प्लेगच्या साथीत आणलेला हा कायदा कोविडपाठोपाठ आता म्युकरमायकोसिससाठीही लागू होत आहे.
  • देशात गेल्या महिनाभरात या रुग्णांची संख्या काही हजारांत पोहचली आहे. एकट्या महाराष्ट्रातच या आजाराचे ८०० ते ८५० रुग्ण असल्याचं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

वाढती संख्या पाहता राज्याला २ लाख इंजेक्शनची गरज आहे. पण काही कारणामुळे ही इंजेक्शन मिळायलाही ३१ मे ची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस महत्वाचे आहेत. या आजाराबाबत आरोग्यमंत्र्यांच्या बोलण्यात जो इशारा आहे तो महत्वाचा आहे. आज केंद्रानं उचललेल्या पावलातही तेच गांभीर्य दिसतंय. म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी हा आजार कोविडच्या उपचारात स्टेरॉईडचा अतिवापर केल्यानं होतो असं सांगितलं जातंय. सुरुवात नाकापासून होते आणि नंतर मेंदूपर्यंत हे इन्फेक्शन पोहचतं.

कोरोनाशी लढतानाच आता म्युकरमायकोसिस सारख्या नव्या आजारांची आव्हानं समोर येत आहेत. त्यामुळे याबाबत वेळीच खबरदारी घेणं आवश्यक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा