30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषराष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आजपासून पर्यटकांसाठी खुले

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आजपासून पर्यटकांसाठी खुले

Google News Follow

Related

दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातील एक आकर्षण बिंदू असलेले मुघल गार्डन आजपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनात प्रति वर्षी होणाऱ्या वार्षिक उद्यानोत्सवाचा एक भाग म्हणून हे उद्यान पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवार १० फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रपती भवनाच्या वार्षिक ‘उद्यानोत्सव’ चे उद्‌घाटन केले.

या उत्सवाच्या अंतर्गत मुघल गार्डन हे १२ फेब्रुवारी २०२२ ते १६ मार्च २०२२ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत खुले असणार आहे. पण हे उद्यान पाहण्यासाठी शेवटचा प्रवेश हा संध्याकाळी ४ वाजता दिला जाईल. त्यांनतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या कालावधीत देखभालीचे सोमवार वगळता इतर सर्व दिवस सामान्य लोकांसाठी उद्यान खुले राहील.

मुघल गार्डनला भेट देण्यासाठी आगाऊ ऑनलाइन नोंदणी आवश्यक असणार आहे. या नोंदणीद्वारेच पर्यटकांना गार्डन पाहण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी https://rashtrapatisachivalaya.gov.in किंवा https://rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही खबरदारीचा उपाय म्हणून नोंदणीशिवाय म्हणजेच वॉक-इन एंट्री उपलब्ध होणार नाही.

हे ही वाचा:

‘राऊत आणि परबांसाठी अनिल देशमुखांच्या बाजूच्या खोल्या सॅनिटाइज कराव्यात’ 

ठाकरे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे अडचणीत

आज पडणार IPL चा हातोडा! कोण होणार मालामाल? कोणाला मिळणार ठेंगा?

मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा?

गार्डन पाहण्यासाठी एकूण ७ स्लॉट्स उपलब्ध असणार आहेत. हे स्लॉट सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दरम्यान उपलब्ध असतील. या प्रत्येक स्लॉटमध्ये जास्तीत जास्त १०० व्यक्तींचा समावेश असेल. या भेटी दरम्यान पर्यटकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि इतर कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे लागेल. त्यांना प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग करावे लागेल. तसेच मास्कशिवाय कोणालाच परवानगी दिली जाणार नाही. जेथे नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू राष्ट्रपती भवनाला मिळतो त्या जवळ असलेल्या राष्ट्रपती इस्टेटच्या गेट क्रमांक 35 मधून प्रवेश आणि निर्गमन असेल.

या भेटी दरम्यान अभ्यागत मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतात.मात्र, त्यांनी कोणत्याही पाण्याच्या बाटल्या, ब्रीफकेस, हँडबॅग/लेडीज पर्स, कॅमेरा, रेडिओ/ट्रान्झिस्टर, बॉक्स, छत्र्या, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा आणि खाण्याचे साहित्य इत्यादी आणू नयेत अशी विनंती करण्यात आली आहे. सार्वजनिक मार्गावर विविध ठिकाणी हँड सॅनिटायझर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रथमोपचार/वैद्यकीय सुविधा यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा