28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरविशेषमुंबई- अहमदाबाद- मुंबई ‘क्रिकेट स्पेशल’ ट्रेन धावणार!

मुंबई- अहमदाबाद- मुंबई ‘क्रिकेट स्पेशल’ ट्रेन धावणार!

तीन विशेष ट्रेन धावणार असल्याची घोषणा  

Google News Follow

Related

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रविवार, १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्याला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. देशभरातून क्रिकेटचे चाहते अहमदाबादला रवाना होत असताना मुंबईहून अहमदाबाद गाठणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अहमदाबादला जाण्यासाठी लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वेकडून क्रिकेट सामान्यासाठी विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. या सर्व गाड्या १८ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वेगवेगळ्या स्थानकांवरून वेगवेगळ्या वेळी धावतील आणि अहमदाबादला पोहचतील.

प्रवाशांची सोय आणि त्यांच्या प्रवासाची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या विशेष भाड्याने धावतील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून या गाड्या चालवण्याबाबत माहिती दिली आहे.

वांद्रे टर्मिनस- अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल (०९००१/०९००२)

वांद्रे टर्मिनस- अहमदाबाद स्पेशल ट्रेन (०९००१) ही शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी वांद्रे टर्मिनस येथून २३:४५ वाजता सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता अहमदाबादला पोहचेल. तर, अहमदाबाद- वांद्रे टर्मिनस स्पेशल ट्रेन (०९००२) ही सोमवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ४.०० वाजता अहमदाबादहून रवाना होईल आणि त्याच दिवशी सकाळी १२.१० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहचले.  ही ट्रेन दोन्ही दिशांचा प्रवास करताना बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा या स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी 2-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील. 

मुंबई सेंट्रल- अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल (०९०४९/०९०५०)

मुंबई सेंट्रल- अहमदाबाद स्पेशल ट्रेन(०९०४९) ही शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी मुंबई सेंट्रलहून २३.५५ वाजता सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४५ वाजता अहमदाबादला पोहचेल. त्याचप्रमाणे अहमदाबाद- मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन (०९०५०) ही सोमवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६.२० वाजता अहमदाबाद येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४.१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहचेल. ही ट्रेन दोन्ही दिशांचा प्रवास करताना बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, भरूच आणि वडोदरा स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास असे डबे असतील.

हे ही वाचा:

मोबाईल वर गेम खेळण्यास मना केल्याने मुलाची आत्महत्या

श्रीलंका सरकारकडून बीसीसीआय सचिव जय शहांची माफी

दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय

ललित पाटील प्रकरणी पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अहमदाबाद सुपरफास्ट स्पेशल (०११५३/०११५४)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अहमदाबाद स्पेशल ट्रेन (०११५३) ही शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता अहमदाबादला पोहचेल. त्याचप्रमाणे अहमदाबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल ट्रेन (०११५४) ही सोमवार, २० नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथून १.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १०.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचेल. ही गाडी दादर, ठाणे, वसई रोड, सुरत आणि वडोदरा स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी 2-टायर आणि एसी 3-टायर कोच असतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा