31 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरविशेषमुंबई महापालिकेने ५४ हजार खड्डे भरले

मुंबई महापालिकेने ५४ हजार खड्डे भरले

गत पाच वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरी

Google News Follow

Related

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या अनुषंगाने गत पाच वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरी यंदा नोंदवली गेली आहे. पावसाळापूर्व कामे आणि नियोजन, तसेच पावसाळ्यात त्याची चोख अंमलबजावणी याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात खड्डे तत्परतेने भरणे शक्य झाले आहे. पावसाने दिलेल्या उघडीपनंतर मुंबई महानगरात ५४ हजार खड्डे बुजवण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण यंत्रणेने केलेले सूक्ष्म नियोजन, खड्डे बुजवण्यासाठी स्वतःहून घेतलेला पुढाकार आणि संयुक्त कामगिरीमुळे मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींचा विक्रमी वेळेत निपटारा करण्यात महानगरपालिका प्रशासनाला यश आले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेने सर्व उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. विशेष म्हणजे, यंदा नागरिकांकडून आलेल्या तक्रारींपेक्षा अधिक खड्डे यंत्रणेने स्वतः पुढाकार घेत भरले आहेत.

मुंबईतील तीन महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवर खड्डे बुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले आहेत. महत्वाचे म्हणजे नागरिकांच्या तक्रारीवर अवलंबून न राहता तुलनेत स्वतःहून सक्रीयपणे संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे नियोजनच यंदा करण्यात आले आहे. प्रत्येक विभागात तसेच मुख्य रस्त्यांवर देखील खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि सूक्ष्म नियोजन याचाच प्रत्यय यंदा आला आहे. समवेत, मध्यवर्ती यंत्रणा आणि विभाग कार्यालयामार्फत झालेले समन्वय यामुळेच खड्ड्याच्या तक्रारी वेळेत मार्गी लावण्यात देखील यश आले आहे, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त वेलरासू यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले की, मुंबईत यंदा जुलै महिन्यात चार दिवस असे राहीले की एकाच दिवसात २०० मिमी पेक्षा अधिक पाऊस कोसळला. सोबतच रस्त्यांवर वाहतुकीचा भार असतोच. सतत पाऊस सुरु राहिल्याने खड्डे होतात. मात्र, पावसाने विश्रांती घेताच संपूर्ण यंत्रणेने नियोजनाप्रमाणे अतिशय सूक्ष्म कामगिरी करत सगळीकडे खड्डे बुजवले. मुंबईतील रस्त्यांवर सततची व मोठ्या प्रमाणातील अवजड वाहनांची वर्दळ पाहता वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून ही कामगिरी अतिशय विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची किमया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने केली आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातल्या ३३ पोलिसांना पोलीस शौर्य तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक

काश्मीरमध्ये ‘हिजबुल’ दहशतवाद्याच्या भावानेच फडकवला तिरंगा

चांद्रयान- ३ चंद्राच्या जवळ पोहचले; १५० किमी x १७७ किमीच्या कक्षेत प्रदक्षिणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ध्वजारोहणाचा विक्रम

मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग (१८.६ किलोमीटर – मुलुंड ते शीव) आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग (२७.६ किलोमीटर- दहिसर चेकनाका ते माहीम) अशा दोन्ही द्रुतगती महामार्गांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नोव्हेंबर २०२२ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांची जबाबदारी देखील महानगरपालिकेकडे आहे. समवेत, पूर्व मुक्त महामार्गाची (१७ किलोमीटर) जबाबदारी देखील महानगरपालिकेकडेच आहे. या तिन्ही महामार्गांच्या जबाबदारीचे आव्हान स्वीकारतानाच या रस्त्यांवर खड्डे राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी रस्ते विभागाने घेतली आहे, असेही अति॑रिक्त आयुक्त वेलरासू यांनी नमूद केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा