पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगढमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना त्यांनी गर्दीत उभ्या असलेल्या एका लहान मुलीला पाहिले. या मुलीने मोदी यांचे चित्र कागदावर रेखाटले होते आणि ती ते घेऊन उभी होती. त्यानंतर पंतप्रधानांनी तिला ‘मुली, मी तुला आशीर्वाद देतो. याच्यावर तू तुझे नाव लिही. मी तुला नक्की पत्र लिहीन,’ असे आश्वासन दिले.
पंतप्रधान मोदी छत्तीसगढमधील कांकेर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पोहोचले होते. जेव्हा मोदी भाषण देत होते, तेव्हा गर्दीमध्ये एका मुलीने पंतप्रधान मोदी यांचे स्केच हातामध्ये घेऊन वरती उचलले होते. जेव्हा मोदी यांनी तिला पाहिले तेव्हा ते लगेच म्हणाले की, मुली, मी तुझे चित्र पाहिले आहे. तू इतके चांगले काम करून आली आहेस. मी तुला आशीर्वाद देतो. पण मुली, तू थकशील. तू कधीपासून उभी आहेस. मला पोलिसांना आवाहन करायचे आहे की, ही मुलगी हे चित्र देऊ करते आहे, तर ते घ्या. ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. मुली, तुझा पत्ता तू यावर नक्की लिही. मी तुला नक्की पत्र लिहीन.
हे ही वाचा:
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मागे; सरकारला २ जानेवारीपर्यंत दिला वेळ
मराठा आरक्षणामुळे संभाजीनगरातील आठ आगाराच्या एसटी बस जागेवरच!
बँक कर्जाचे पैसे जेटच्या संस्थापकांनी पत्नी, मुलाच्या माध्यमातून इतरत्र वळवले
पंतप्रधान मोदी जेव्हा असे बोलले तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. मोदी यांच्या प्रतिक्रियेनंतर ती खूप आनंदित झाली होती. पंतप्रधानांनी या मुलीप्रति व्यक्त केलेल्या भावना पाहून अनेकजण त्यांची स्तुती करू लागले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.