30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरविशेषप्रजासत्ताक दिनी महिला शक्तीचे दिसले सामर्थ्य

प्रजासत्ताक दिनी महिला शक्तीचे दिसले सामर्थ्य

संगीत, नृत्य, पथसंचलनात महिलांनी बाजी मारली

Google News Follow

Related

कर्तव्यपथावर नेहमीप्रमाणे भारतीय सैन्यदलाचे सामर्थ्य दिसलेच पण यंदाच्या प्रजासत्ताकदिनी महिलांच्या सशक्तीकरणाचे दर्शन घडले. सैन्यदलातील महिलांची ताकद, सांस्कृतिक कार्यक्रमातील महिलांचे बहारदार संगीतनृत्य यांनी सर्वांची मने जिंकली.

पथसंचलनाची सुरुवात १०० पेक्षा अधिक कलाकारांनी केली. विविध वाद्य वाजवत महिलांचे पथक कर्तव्यपथावर चालू लागले. तेव्हापासून महिलांच्या सशक्तीकरणाचे दर्शन घडू लागले. या महिलांनी शंख, नादस्वरम, नगारा, ढोल ताशे या पारंपरिक वाद्यांच्या सहाय्याने वातावरणात उत्साह निर्माण केला. देशभरातील विविध राज्यांच्या महिलांचा त्यात समावेश होता. पूर्वी पारंपरिक लष्करी बँडचा वापर केला जात असताना यंदा मात्र ही परंपरा बदलण्यात आली. त्याजागी महिला कलाकारांना संधी देण्यात आली.

तिन्ही सैन्यदलातील महिलांनीही आपले कौशल्य आणि क्षमता कर्तव्यपथावर सिद्ध केली. भारतीय हवाई दलाच्या पथसंचलनात १५ महिला होत्या. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील महिलांनीही आपले साहस इथे दाखवून दिले. विविध साहसी कलाकृतींचे प्रदर्शन त्यांनी लिलया केले. २६५ महिला पोलिसांनी मोटरसायकलवर स्वार होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्तथरारक कवायतींमध्ये तलवार, रायफल, लॅपटॉप, कॅमेरा हाताळताना महिला दिसल्या. महिलांच्या या ताकदीचे दर्शन सोशल मीडियावरही पसंतीस उतरले. त्याचे व्हीडिओ चांगलेच व्हायरल झाले.

हे ही वाचा:

प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झळकला ‘शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ’!

भारताने पाकिस्तानसोबत नाणेफेक करून जिंकली होती राष्ट्रपती वापरत असलेली ‘बग्गी’

फ्रान्सच्या तुकडीत सहभागी असणारे सहा भारतीय कोण?

गर्दीच्या दबावतंत्राची अखेर…

 

भारतीय सेनादलाच्या तुकडीचे नेतृत्व शरण्याने केले आणि सर्वांची वाहवा मिळविली. नौदलाच्या तुकडीत १४४ पुरुष आणि महिला अग्निवीरांचा समावेश होता. त्यांचे नेतृत्व मुदिता गोयल, शर्वणी सुप्रिया व देविका यांनी केले.  नौदलाच्या या पथसंचलनात सी पॉवर ॲक्रॉस द ओशियन्स थ्रू इंडिजिनेशन ही थीम दाखविण्यात आली.

चित्ररथातूनही महिला सशक्तीकरण आणि नारीशक्तीचे दर्शन घडले. महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांची प्रतिमा लक्ष वेधून घेत होती. या चित्ररथाच्या सोबत महिलांचेच पथक नृत्य करत पुढे वाटचाल करत होते. त्यातील एका महिला कलाकाराने दांडपट्टा फिरवत सर्वांच्या टाळ्या मिळविल्या.

निवडणूक आयोगाच्या चित्ररथातून मतदानाचे महत्त्व सांगण्यात आले त्यातही हाताची प्रतिकृती दाखविण्यात आली होती. तो हातही महिलेचाच होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा