28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरविशेषइंग्लंडची निराशाजनक कामगिरी पाहून नासिर हुसैन संतापले!

इंग्लंडची निराशाजनक कामगिरी पाहून नासिर हुसैन संतापले!

इंग्लंडच्या खेळाडूंना आत्मपरीक्षण करण्याची गरज,हुसैन

Google News Follow

Related

धर्मशाला येथे इंग्लंड आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडची कामगिरी फारच निराशाजनक होती. त्यामुळे नासिर हुसैनही संघावर संतापले. ‘फलंदाजांची अशी कामगिरी चिंताजनक असून त्यांनी त्यांच्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे,’ अशा शब्दांत त्यांनी इंग्लंडच्या संघाला सुनावले.

इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाजांनी अर्धशतकी भागिदारी करून चांगली सुरुवात करून दिली. मात्र मधल्या फळीचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. एका वेळी तर पाहुण्या संघाची धावसंख्या तीन विकेट गमावून १७५ होती, मात्र संपूर्ण इंग्लंड संघ २१८ धावांत गारद झाला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या शतकाच्या जोरावर एक विकेट गमावून भारताला १३५ धावसंख्या उभारता आली. इंग्लंडकडे आता अवघी ८३ धावांची आघाडी आहे.

हे ही वाचा :

मोहम्मद शमी उतरणार निवडणुकीच्या मैदानात?

रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?

बेंगळुरूत पाण्याची भीषण टंचाई

उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!

‘इंग्लंडने निश्चितच मागील दोन सामने जिंकण्याच्या संधी गमावल्या. त्यांच्याकडे सामने जिंकण्याच्या संधी होत्या, मात्र त्यांनी तसे केले नाही. आज दुपारचे सत्र इंग्लंडसाठी सर्वांत निराशाजनक होते. तीन विकेट १७५वरून सहा विकेट १७५. मधली फळी अपयशी ठरली. ही इंग्लंडच्या फलंदाजांची आततायी कृती ठरली आहे आणि हे चिंताजनक आहे,’ असे नासिर हुसैन यांनी सांगितले.

‘माझ्या मते, फलंदाजी दृष्टिकोनासह इंग्लंडच्या खेळाडूंना आपल्या खेळाकडे लक्ष देण्याची आणि सुधारणेचा प्रयत्न करण्याची गरज आहे. तुमची योजना काहीही असेल, तुमचे प्रशिक्षक आणि कर्णधार काहीही सांगतील, मात्र रवीचंद्रन सारखा महान आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूही जिथे खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, तो अजून चांगला बनण्याचा प्रयत्न करतो,’ असेही ते म्हणाले. इंग्लंडच्या खेळाडूंना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे सांगितले. हुसैन यांनी विशेषतः जॅक क्रॉली, जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स यांना वाईट कामगिरीसाठी दोषी ठरवले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा