26 C
Mumbai
Friday, September 29, 2023
घरविशेषझुरिच डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

झुरिच डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

५.७१ मीटरचे लक्ष्य गाठून नीरज दुसऱ्या स्थानी

Google News Follow

Related

जागतिक ऍथेलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने झुरिच डायमंड लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले. ८५.७१ मीटरचे लक्ष्य गाठून नीरज दुसऱ्या स्थानी राहिला. झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेजने या लीगमध्ये अव्वल स्थान पटकावले.

नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८०.७९ मीटर अंतरावर भालाफेक केली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात ‘फाऊल’ नोंदवला गेला. परिणामी, त्याचे स्थान पाचव्या क्रमांकावर घसरले. जर्मनीचा ज्युलियन वेबर यादीमध्ये आघाडीवर होता. चोप्राने चौथ्या प्रयत्नात ८५.२२ मीटरचे लक्ष्य गाठून दिमाखदार पुनरागमन केले. त्यामुळे तो जेकब वडलेजच्या मागे दुसऱ्या स्थानावर पोहोचला. मात्र, चोप्राने पाचव्या प्रयत्नात आणखी एक फाऊल केला. अंतिम प्रयत्नात, चोप्राने ८५.७१ मीटर अंतराचे लक्ष्य गाठले आणि वडलेचच्या ८५.८६ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाला जवळपास मागे टाकले.

बुडापेस्ट, हंगेरी येथे झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बनून नीरज चोप्रा याने इतिहास रचला आहे. त्याने पुरुषांच्या भालाफेक फायनलमध्ये ८८.१७ मीटरची सर्वोत्तम नोंद करत ही कामगिरी केली. तो त्याच्या पहिल्याच थ्रोने (८८.१७ मी) अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. तो पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरला आहे.

सन २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करण्यापूर्वी चोप्राने २०२२ मध्ये ओरेगॉन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक रौप्य पदकही जिंकले होते. जागतिक ऍथेलेटिक्समध्ये भारताचे हे दुसरे पदक होते. याआधी सन २००३ मध्ये लांब उडीमध्ये अंजू बॉबी जॉर्ज हिने ब्राँझ पदकाची कमाई केली होती.

हे ही वाचा:

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या

केंद्र सरकारकडून ‘वन नेशन वन इलेक्शन’साठी समितीची स्थापना

मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू

एक देश, एक निवडणूक विधेयक संसदेत येणार?

नीरज चोप्रा याने मे २०२३ मध्ये, दोहा डायमंड लीगमध्ये ८८.६७ मीटरचे लक्ष्य गाठून अव्वल स्थान पटकावले. त्याच महिन्यात, त्याने जागतिक ऍथलेटिक्सने प्रकाशित केलेल्या पुरुषांच्या भालाफेक क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान मिळवले. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकासह, २५ वर्षीय चोप्राने आता प्रत्येक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. झुरिचमध्ये दुसऱ्या स्थानावर राहूनही नीरजची डायमंड लीग स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी राहिली. नीरजने याच शहरात २०२२मध्ये डायमंड लीगची अंतिम फेरी ८८.४४ मीटरचे लक्ष्य गाठून जिंकली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,034अनुयायीअनुकरण करा
101,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा