29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषनीरज चोप्राला नेले रुग्णालयात

नीरज चोप्राला नेले रुग्णालयात

Google News Follow

Related

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ॲथलॅटिक्समध्ये प्रथमच सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा आजारी पडला आहे. त्याबरोबरच त्याला रुग्णालायात दाखल करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याची प्रकृती सध्या ठीक नाही. भारतात परतल्यानंतर त्याला ताप आला होता. त्यानं रुग्णालयात उपचारही घेतले. दरम्यान, पानिपत इथं एक स्वागत समारंभ त्याने प्रकृतीच्या कारणास्तव अर्धवट सोडला. त्यानंतर नीरज चोप्राला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप जास्त आल्यानं मंगळवारी नीरज चोप्राला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजते.

नीरज चोप्राला ताप आल्यानंतर त्याची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली होती. १५ ऑगस्टला त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पानिपत इथं एका कार्यक्रमात नीरज चोप्राला स्टेजवरच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर नीरजला रुग्णालयात नेण्यात आले आहेत. नीरज दिल्ली ते पानीपत अशा कार रॅलीमध्ये सहभागी झाला होता, त्यावेळी नीरज अस्वस्थ वाटत होता.

हे ही वाचा:

लसीचा एक डोस घेतलात तरी तुम्ही सुरक्षित

मद्यालय चालू, देवालय बंद

पालकच म्हणू लागले शाळा सुरू करा!

मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस

टोकियोमधून परतल्यापासून नीरज चोप्रा वेगवेगळ्या सत्कार समारंभात आणि कार्यक्रमात सहभागी होत आहे. त्याच्या मूळ गावी स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. नीरज चोप्रा मंगळवारी सकाळी पानिपतमध्ये पोहोचला होता. त्यानंतर समालखातील हल्दाना सीमेवरून तो खंडरा इथं पोहोचला. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या स्वागताची तयारी करण्यात येत होती. कुटुंबाने हजारो लाडू तयार करण्यासाठी १०० हून अधिक आचारी कामाला लावले होते. यासाठी गुरुवारपासून काम सुरु होते.

नीरजच्या आईने एएनआयशी बोलताना सांगितलं की, त्याचं जंगी स्वागत होईल. त्याच्यासाठी चुरमा तयार केला आहे. त्याचं सुवर्णपदक आम्ही मंदिरात ठेवू. मी त्याच्या येण्याची वाट बघत आहे.

नीरजच्या स्वागताची पूर्ण तयारी झाली आहे. त्याचं स्वागत जंगी असणार आहे आणि नातेवाईक, गावकऱ्यांना या स्वागत समारंभासाठी बोलावलं आहे. गावात सण असल्यासारखा उत्साह आहे असं एका गावकऱ्याने म्हटलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा