27 C
Mumbai
Friday, September 30, 2022
घरविशेषनिर्मला सीतारामन यांनी 'बीमा मंडी'ची घेतली विशेष दखल

निर्मला सीतारामन यांनी ‘बीमा मंडी’ची घेतली विशेष दखल

साप्ताहिक विवेकच्या ‘स्व ७५ ग्रंथ’ विशेषकांचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याहस्ते प्रकाशन

Related

स्वातंत्र्यानंतर समाजवादी विचारसरणीने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. ती पुन्हा रुळावर आणण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील ‘स्व ७५ ग्रंथ’ या साप्ताहिक विवेक समुहाच्या विशेषाकांच्या प्रकाशन प्रसंगी अर्थमंत्री बाेलत हाेत्या. या विशेषांकात भारताच्या आंतरिक शक्तींवरील लेखांचे संकलन करण्यात आले आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करतानाच देशातील ग्रामीण भागात विमा संरक्षणाचा पाया मजबूत करणाऱ्या बीमा मंडी या प्रकल्पाची विशेष दखल घेतली. त्यानिमित्ताने कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर, उपाध्यक्षा शीतल कारुळकर यांचा खास सत्कारही निर्मला सीतारामन यांनी केला.

ग्रामीण भागातील जनतेला विमा संरक्षणाबद्दल माहिती करून देणे, त्या माध्यमातून त्यांचे जीवन अधिक सुरक्षित करणे हा बीमा मंडीचा उद्देश आहे.बीमा मंडीच्या माध्यमातून अगदी वाजवी आकारात हा विमा उतरविण्यात येतो. त्यामुळे बीमा मंडीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मायक्रो इन्शुरन्सचे ग्रामीण भागातील महत्त्व वाढत चालले आहे. त्याची दखल निर्मला सीतारामन यांनी घेऊन या उपक्रमाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रशांत कारुळकर आणि शीतल कारुळकर यांनीही निर्मला सीतारामन यांचे स्वागत केले.

सीतारामन म्हणाल्या की, १७०० साली जगाच्या उत्पन्नात भारताचा वाटा २३.६ टक्के होता, पण १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा हा वाटा ३.५८ टक्क्यांवर आला होता. स्वातंत्र्यानंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याचा जो वेग यायला हवा होता, तो समाजवादामुळे होऊ शकला नाही. उद्योजकतेला पाठिंबा देण्याऐवजी लायसन्स-परमिट राजवर भर दिला गेला. याचा परिणाम म्हणजे १९९१ पर्यंत आपल्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची मदत घ्यावी लागली आणि त्याच्या अटींचे पालन करावे लागलं याकडं त्यांनी लक्ष वेधलं.

भारतीय अर्थव्यवस्थेने ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात माेठी अर्थव्यवस्था बनली आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते येणाऱ्या २०२९ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात माेठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज व्यक्त कला आहे. त्यामुळे आजचा दिवस सुवर्ण दिवस असून अशा वातावरणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते ‘स्व ७५’ हिंदी ग्रंथाचे प्रकाशन हाेणे ही साैभाग्याची गाेष्ट असल्याचे विवेक समुहाचे मुख्य कार्यकारी संपादक अमाेल पेडणेकर म्हणाले. पेडणेकर यांनी यावेळी या ग्रंथाच्या प्रकाशनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रंगंमचावर श्री सुरत गिरी बंगला गिरीशानंद आश्रमाचे अकरावे पीठाधीश्‍वर महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, युपीए लिमिटेडचे अध्यक्ष पद्मभूषण रज्जुभाई श्राॅफ, कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा शीतल कारुळकर, विवेक मासिकाचे प्रबंध संपादक विवेक करंबेळकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित हाेते.

देशात बाजपेयी सरकार आल्यानंतर त्यात काही बदल झाल्याचे सांगून अर्थमंत्री पुढे म्हणाल्या, नंतरच्या सत्तापरिवर्तनात अर्थव्यवस्था पूर्णत: डबघाईला आली. २०१४ पासून ती पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे संपूर्ण मदत थेट लोकांना दिली जात आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वत: सांगितले होते की, मी १०० पैसे पाठवले तर केवळ १५ पैसे तळापर्यंत पोहोचतात. पण आता तसे नाही, जनतेला पूर्ण मदत उपलब्ध आहे.

हे ही वाचा:

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार

मुंबईत सकाळपासून दमदार, जोरदार

‘प्रिन्स चार्ल्स पायउतार होतील’ कोण म्हणतंय असं

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स

सर्वांच्या प्रयत्नातूच भारताला शिखर गाठणे शक्य

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या पंतप्रधानांच्या घोषणेला त्यांनी आणखी दोन शब्द जोडले. आता यात ‘सबका प्रयत्न’ जोडण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर आता पुढील २५ वर्षे आपल्यासाठी ‘अमृत काळ’ आहेत. या काळात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनीच भारत शिखरावर पोहोचू शकताे असा विश्वास सीतारमण यांनी यावेळी व्यक्त केला.

हिंदीत बाेलताना संकाेच वाटताे

अर्थमंत्री निर्मला सीतारमण हिंदीत आपला मुद्दा नीट मांडतात. मात्र हिंदी बोलताना संकोच वाटतो, असे त्या म्हणाल्या . याबाबतची आ ठवण सांगताना सीतारमण म्हणाल्या की, जेव्हा मी तामिळनाडूमधील महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा राज्य सरकारने हिंदी किंवा संस्कृत ही दुसरी भाषा म्हणून निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारली होती. मला हिंदी बाेलताना खूप संकाेच वाटताे. पण एका विशिष्ट वयानंतर माणसाला नवीन भाषा शिकणे अवघड जाते असेही त्या यावेळी म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
41,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा