33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषमालदीवने दाखविली मस्ती...१० मे नंतर एकही भारतीय सैनिक इथे राहणार नाही!

मालदीवने दाखविली मस्ती…१० मे नंतर एकही भारतीय सैनिक इथे राहणार नाही!

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

मालदीवची भारतविरोधी भूमिका काही कमी होत नाहीये.आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी आणखी एक मोठे व्यक्तव्य आहे.मुइज्जू म्हणाले की, १० मे नंतर एकही भारतीय सैनिक आपल्या आपल्या देशात उपस्थित राहणार नाही, अगदी साध्या पोषाखातही नाही.यापूर्वी राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारतीय लष्करी जवानांच्या पहिल्या गटाला देशातून परतण्यासाठी १० मार्च २०२४ ही अंतिम मुदत दिली होती.

किबा बेटावरील इधाफुशी निवासी समुदायाला संबोधित करताना मुइज्जू बोलत होते.ते म्हणाले की, भारतीय सैन्याला देशातून बाहेर काढण्यात त्यांच्या सरकारला यश आल्याने खोट्या अफवा पसरवणारे लोक परिस्थितीचा विपर्यास करत आहेत.ते पुढे म्हणाले की, हे लोक( भारतीय लष्कर) देश सोडून जात नाहीत, ते त्यांचे गणवेश बदलून साधे कपडे घालून परतत आहेत.आपल्या मनात शंका निर्माण करणारे आणि खोटेपणा पसरवणारे विचार आपण पुढे आणू नयेत.

हेही वाचा :

नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणात जी एन साईबाबा निर्दोष

बलात्कार पीडित स्पॅनिश महिलेच्या पतीला १० लाखांची भरपाई

पंतप्रधान मोदींच्या मशालीने मुस्लिमांमध्ये पसरलेला अंधार दूर करेन!

रणजी ट्रॉफी: मुंबईची तामिळनाडू संघावर मात, फायनलमध्ये धडक!

मुइज्जू पुढे म्हणाले की, १० मे नंतर एकही भारतीय सैनिक देशात उपस्थित राहणार नाही.’ना गणवेशात ना साध्या कपड्यात’.भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारच्या पोशाखात या देशात राहणार नाही. हे मी आत्मविश्वासाने सांगतो.त्यांचे हे विधान अशा वेळी आले जेव्हा, मालदीवने चीनशी मोफत लष्करी मदत मिळवण्याचा करार केला.

दरम्यान, सध्या 88 भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये आहेत, जे प्रामुख्याने दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान चालवतात. याद्वारे त्यांनी शेकडो वैद्यकीय बचाव आणि मानवतावादी मदत मोहिमे पूर्ण केली आहेत. आता १० मे पर्यंत सर्व कर्मचारी भारतात परत जातील असे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा