32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर विशेष दहावीच्या विद्यार्थांचे पुनर्मूल्यांकन होणार नाही

दहावीच्या विद्यार्थांचे पुनर्मूल्यांकन होणार नाही

Related

यंदा दहावीच्या परीक्षेवरून चांगलाच घोळ आपल्याला पाहायला मिळाला. आता बोर्डाने अजून एका निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे पुनर्मूल्यांकनाचा. यंदा एसएससीचे विद्यार्थी गुणांबाबत समाधानी नसल्यास तयांचे पुनर्मूल्यांकन होणार नाही. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (एमएसबीएसएचएसई) जाहीर केलेले निकालच अंतिम स्वरूपात राहणार आहेत.

यासंदर्भात बोलताना एमएसबीएसएचएसईचे सचिव अशोक भोसले म्हणाले की, कोरोनामुळे एसएससी परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या ९ वी आणि १० च्या गुणांच्या आधारे ५०:५० च्या पद्धतीवर मूल्यांकन केले जाणार आहे. अंतिम निकालावर नापसंती असणारे विद्यार्थी कोरोनाच्या परिस्थितीनुसार नंतर ऑफलाइन परीक्षा देऊ शकतील.

हे ही वाचा:

पायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या

आम्ही जंगलातल्या वाघाशी मैत्री करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही

… की महानगरपालिकेला आणखीन बळी हवे आहेत?

प्रशांत किशोर-शरद पवार भेट आज सिल्वर ओकवर

पुनर्मूल्यांकनाचे अर्ज हे शाळांद्वारे बोर्डाकडे पाठविले जातात. त्यानंतर बोर्ड अर्ज प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्याच्या शाळेतील विषय शिक्षकांना पेपरची एक छायाचित्र पाठवते. मूळ गुणपत्रिका परीक्षकाद्वारे तपासली जाते. पण यंदा मूळातच शाळेतूनच सर्व काही मूल्यांकन होत असल्यामुळेच बोर्डाने पुनर्मूल्यांकनासाठी पेपर पाठवू नये असा निर्णय घेतलेला आहे.

एकूणच या सर्व किचकट प्रक्रियेमुळे शाळांसमोर अनेक यक्षप्रश्न उभे राहिले आहेत. यासंदर्भात बोलताना एका शिक्षकाने म्हटले आहे की, पुनर्मूल्यांकन केले नाही तर, शाळांवर अधिक दबाव येणार आहे. परंतु यावर भोसले म्हणाले की, शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी एक दक्षता समिती नेमण्यात येणार आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी एसएससी निकालापेक्षा राज्यसरकारने आधीपासून कॉमन एन्ट्रन्स टेस्टला (सीईटी) अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच दहावीचा निकाल जुलैच्या मध्यापर्यंत लागण्याची अपेक्षा आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा