29 C
Mumbai
Thursday, November 24, 2022
घरविशेषएअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांना टिकली, बांगडीबद्दल सूचना

एअर इंडियाच्या विमानातील कर्मचाऱ्यांना टिकली, बांगडीबद्दल सूचना

जागतिक दर्जाची एअरलाइन्स बनवण्याच्या दिशेने वाटचाल

Google News Follow

Related

एअर इंडिया सात दशकांनंतर टाटा समूहाकडे परतल्याने परिस्थिती बदलतेय. जागतिक दर्जाची एअरलाइन्स बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या एअर इंडियाने क्रू मेंबर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एअर इंडियामध्ये एअर होस्टेस आणि क्रू मेंबर (कर्मचारी) नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. टाटा नेहमीच त्यांच्या एअर इंडियातील कर्मचाऱ्यांच्या पेहरावाबद्दल जागरूक असते. एवढेच नाही तर जेआरडी टाटा जेव्हा विमानसेवा चालवायचे तेव्हाही ते कर्मचाऱ्यांच्या पेहरावाबाबत दक्ष असत.

एअर इंडियाने एअर हॉस्टेसचे वजन, मेकअप, पेहराव कसा असावा आणि कसा असू नये, याची संपूर्ण यादी जारी केली आहे. केबिन अटेंडंटच्या लूकबाबतही यात उल्लेख आहे. महिला कर्मचाऱ्यांची मार्गदर्शक तत्त्वांची यादी थोडी लांबलचक आहे. केबिन क्रूमधील पुरुषांसाठी देखील मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ज्यांचे केस कमी आहेत किंवा टक्कल आहे. टिकलीचा आकारापासून बांगड्यांची संख्या किती असावी, हे निश्चित करण्यात आले आहे.

टिकलीचा आकार ०.५ सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावा

महिला कर्मचाऱ्यांना एकापेक्षा जास्त बांगड्या घालण्याची परवानगी नाही. त्यांना मोत्याचे कानातले न घालण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कानात फक्त सोन्याचे किंवा चांदीचे गोल आकाराचे झुमके घालू शकणार आहेत. तसेच ०.५ सेमीचीच टिकली लावावी लागणार आहे. याशिवाय विमान प्रवासात महिलांना हातात केवळ एकच बांगडी घालण्याची परवानगी असेल, ज्यामध्ये कोणतेही डिझाइन किंवा स्टोन नसावे.

हेअरस्टाइल कशी असावी

महिला कर्मचारी यापुढे हाय टॉप नॉट्स हेअरस्टाइल करू शकणार नाहीत. केसांमध्ये फक्त चार काळ्या बॉबी पिनला परवानगी असेल. याशिवाय आयशॅडो, लिपस्टिक, नेल पेंट आणि केसांचा रंगही ठरवून देण्यात आलेला आहे. ज्या महिला आणि पुरूष क्रू मेंबर्सचे केसं पांढरे झाले आहेत त्यांना यापुढे केसांना रंग लावावा लागणार आहे. केसांना लावण्यात येणारे हे रंग नैसर्गिक असावे, असेही या गाइडलाईन्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. केसांना फॅशनेबल रंग किंवा मेंदी लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मानेवर, मनगटावर आणि घोट्यावर कोणतेही धार्मिक चिन्ह गोंदवण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

आपले टक्कल गुळगुळीत ठेवावे

एअर इंडियाने ज्या पुरुष कर्मचाऱ्यांना कमी केस आहेत किंवा ज्यांना टक्कल आहे. त्यांना ग्रूमिंग गाइडलाईन्समध्ये क्लीन शेव्हन हेड म्हणजेच टक्कल ठेवण्यास सांगितले आहे. अशांनी रोज मुंडण करायला सांगितले आहे. त्याच वेळी त्यांना विखुरलेले केस किंवा लांब मॅट केस असलेली केशरचना असू शकत नाही.

हे ही वाचा:

‘आणखी श्रद्धा होऊ नयेत ही पालक म्हणून जबाबदारी’

मुंबईकरांना दुमजली बसची प्रतीक्षाच!

‘स्निफर’ डॉग ठेवणार आता परदेशी टपालावर नजर

पोलिस भरतीची तयारी विसरून तो चोर बनला!

 

उच्च शीर्ष गाठ केस बांधणे

महिला क्रू केस बांधण्यासाठी हाय टॉप नॉट आणि लो बन स्टाइल वापरू शकत नाहीत. महिला क्रू कोणत्याही डिझाइनशिवाय फक्त सोने आणि हिऱ्याच्या गोल आकाराच्या अंगठ्या घालू शकतात. दोन्ही हातात एकच अंगठी घालण्याची परवानगी आहे. परंतु अंगठीची रुंदी १ सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी अशी अट आहे.

धार्मिक किंवा काळ्या धाग्याला परवानगी नाही

मनगट, मान आणि घोट्यावर धार्मिक किंवा काळा धागा बांधण्याची परवानगी नाही, असे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात. याशिवाय, कर्मचाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या किंवा शॉपिंग बॅग घेऊन जाण्याची परवानगी नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,953चाहतेआवड दर्शवा
1,978अनुयायीअनुकरण करा
52,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा