कर्नाटक सरकारचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले की, सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये राज्यातील ३४ हजार मंदिरांमध्ये २२ जानेवारीला विशेष पूजा आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर भाजपनेही आनंद व्यक्त केला असून सरकार शुद्धीवर आल्याचे म्हणत टोला लगावला. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
कारसेवकांच्या अटकेनंतर सरकारचा मोठा निर्णय
नुकतेच कर्नाटक पोलिसांनी १९९२ मध्ये रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान झालेल्या दंगलीप्रकरणी एका हिंदू कार्यकर्त्याला अटक केली होती. राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमापूर्वी, भाजपने हिंदू कार्यकर्त्याच्या अटकेवर जोरदार हल्ला चढवला होता आणि सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचे म्हटले होते.याबाबत भाजपने सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्याने काँग्रेस सरकार बॅकफूटवर दिसले. आता राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यातील ३४ हजार मंदिरांमध्ये विशेष पूजा आयोजित करण्याच्या निर्णयाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीर बदलतंय, वर्षभरात पर्यटकांची लाट!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले अयोध्येचे निमंत्रण…
पोलिसांनी आता दांडा नव्हे तर डेटाच्या आधारे काम करावे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राममंदिरासाठी ११ कोटी
भाजपचा टोला
कर्नाटक सरकारच्या निर्णयावर भाजप नेते सीटी रवी म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो.त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे.काँग्रेसला अनेक वर्षानंतर सदबुद्धि आली आहे.भगवान राम सर्वांचे आहेत…काँग्रेसने प्रभू रामांना सोडले होते आणि ते पुन्हा प्रभू रामांकडे येत आहेत.हे देशासाठी चांगले आहे.