33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरविशेषकोरोनाविषयी जागृती निर्माण करणारे, पद्मश्री डॉ. के. के. अगरवाल यांचे निधन

कोरोनाविषयी जागृती निर्माण करणारे, पद्मश्री डॉ. के. के. अगरवाल यांचे निधन

Google News Follow

Related

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रमुख डॉ. के.के. अग्रवाल यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. डॉ. के.के. अग्रवाल हे नाव भारतीय वैद्यकक्षेत्रात सुपरिचीत होते. आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

गेल्यावर्षी देशात कोरोनाची साथ आल्यापासून डॉ. अग्रवाल हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने प्रबोधनाचे काम करत होते. त्यांचे माहितीपूर्ण व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही व्हायचे. डॉ. अग्रवाल यांनी कोरोन लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. परंतु, सोमवारी रात्री ११:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर कुटुंबीयांनी डॉ.अग्रवाल यांच्याच ट्विटर अकाऊंटवरून एक निवेदन प्रसिद्ध केले.

डॉ. अग्रवाल यांनी वैद्यकीय पेशात आल्यापासून कायम समाजकल्याण आणि आरोग्यविषयक प्रबोधनाचे कार्य केले. कोरोनाच्या संकटकाळातही लोकांची भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी अनेक माहितीपूर्ण व्हीडिओ तयार केले होते, असे या निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा:

प्रताप सरनाईकांच्या रिसॉर्टवर इडी आणि सीबीआयचे छापे

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?

प्लाझ्मा थेरेपी आता बंद, कारण काय?

मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात २ लाख ६३ हजार ५३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत १८ हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात देशात ४ लाख २२ हजार ४३६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचा आकडा चार लाखांच्या पार गेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा