28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषगाडी अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू; बहीण जखमी!

गाडी अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू; बहीण जखमी!

दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग २वर झाला अपघात

Google News Follow

Related

झारखंडमध्ये झालेल्या गाडीच्या अपघातात अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू झाला असून त्यांची बहीण जबर जखमी झाली आहे. दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग २वर निरसा बाजार येथे शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास त्यांच्या गाडीची धडक रस्ता दुभाजकाला बसून हा अपघात झाला. झारखंडमधील धनबाद भागात ही दुर्घटना घडली.

या अपघातात पंकज त्रिपाठी यांचा मेहुणा राकेश तिवारी मृत्युमुखी पडले. तर, त्यांची बहीण सबिता तिवारी जखमी झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.हे जोडपे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातून पश्चिम बंगाल येथे जात होते. अपघात झाल्यानंतर त्यांना तातडीने धनबाद येथील शहीद निर्मल महातो मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी राकेश तिवारी यांना आणताच क्षणी मृत घोषित केले.

हे ही वाचा:

मध्य प्रदेश: निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या होमगार्ड्सच्या बसला अपघात

एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे ४ जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील!

मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान

तर, त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या प्रमुख डॉ. दिनेश कुमार गिंदौरिया यांनी दिली.राकेश तिवारी स्वतः गाडी चालवत होते. त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्तादुभाजकाला आदळली. हा अपघात नेमका कसा झाला, हे जाणून घेण्यासाठी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा