27.9 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरराजकारणईव्हीएममुळे जिंकलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ म्हणतात, ईव्हीएम शंकास्पद!

ईव्हीएममुळे जिंकलेले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ म्हणतात, ईव्हीएम शंकास्पद!

ईव्हीएमवर जनतेचा विश्वास नसल्याचा अजब दावा

Google News Follow

Related

सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील १०२ मतदारसंघांत मतदान होत असताना तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विचित्र विधान केले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या स्वतः ईव्हीएमच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकीत विजय मिळवणारे काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांनी ईव्हीएमवरच शंका उपस्थित केली आहे. एएनआयशी बोलताना, काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पुढील २० वर्षांसाठी राहुल गांधी भारताचे पंतप्रधान असावेत, असा आग्रह धरला. तथापि, त्यांनी विरोधाभासी दावेही केले. ते म्हणाले की, त्यांना भाजप नेत्यांनी सांगितले आहे की ईव्हीएम केवळ मोदींच्या बाजूने आहेत, काँग्रेसच्या नाहीत.

मात्र ते हे सोयीस्करपणे विसरले की, काँग्रेसच्या याच नेत्याने अवघ्या सहा महिन्यांपूर्वी तेलंगणाच्या निवडणुका जिंकल्या होत्या, ज्या निवडणुकीत त्याच ईव्हीएमचा वापर मतदानासाठी करण्यात आला होता. त्यांनी आणखी परस्परविरोधी दावे केले. ‘जगभरातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जातात आणि केवळ भारतात त्या ईव्हीएमद्वारे घेतल्या जातात. सन २००४ आणि २००९च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएने ज्या ईव्हीएमने विजय मिळवला होता, ते त्याच ईव्हीएमबाबत बोलत आहेत.

रेड्डी यांनी असा दावाही केला की ईव्हीएम हा ‘अयशस्वी’ प्रयोग आहे आणि भारतातील जनता आता ईव्हीएमवर विश्वास ठेवत नाही, केवळ भाजपचा ईव्हीएमवर विश्वास आहे. रेड्डी यांनी स्वतःच्या विजयाचे स्पष्टीकरण दिले नाही किंवा इतर राज्यांच्या निवडणुका जिथे बिगर-भाजप पक्षांनी निर्णायक विजय मिळवला आहे, त्याचेही. परंतु राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान होण्यापासून रोखणारी एकमेव गोष्ट म्हणजे ईव्हीएम, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

हे ही वाचा:

एमएस धोनी आयपीएलमध्ये ठोकतोय २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा

मध्य प्रदेश: निवडणूक बंदोबस्ताचे काम आटोपून परतणाऱ्या होमगार्ड्सच्या बसला अपघात

‘सल्लामसलतीनंतर निवडणूक रोखे परत दाखल केले जातील’

चेन्नईच्या धोनीने फटकावला १०१ मीटर लांब षटकार

जर राहुल गांधी इतके शक्तिशाली आणि लोकप्रिय आहेत, तर इंडि आघाडीने राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार का घोषित केले नाही, हे रेड्डी यांनी स्पष्ट केले नाही. इंडि आघाडी विसरा, खुद्द काँग्रेस पक्षानेही राहुल गांधींना अध्यक्ष म्हणून निवडले नाही. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने स्पष्ट इशारा देऊनही, इंडि आघाडीच्या सदस्यांनी राहुल गांधींना किंवा त्यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सादर करण्यासाठीही सहमती दिली नाही.

रेवंत रेड्डी यांनी केलेल्या स्वतःच्या दाव्यानुसार ईव्हीएममध्ये कथितपणे हेराफेरी होत असेल तर त्याच ईव्हीएमवर त्यांनी निवडणूक कशी जिंकली हे आधी स्पष्ट करावे. ईव्हीएम हॅक किंवा त्यात छेडछाड कशी केली जाऊ शकते, हे सिद्ध करण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाने वारंवार आव्हाने देऊनही, विरोधी पक्षांना तसे सिद्ध करता आलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा