31 C
Mumbai
Friday, May 24, 2024
घरविशेषचेन्नईच्या धोनीने फटकावला १०१ मीटर लांब षटकार

चेन्नईच्या धोनीने फटकावला १०१ मीटर लांब षटकार

आयपीएलमध्ये अवघ्या नऊ चेंडूंत २८ धावा

Google News Follow

Related

ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर महेंद्रसिंग धोनीची बॅट आणखी तळपू लागली आहे. धोनी याला सूर गवसला असून शुक्रवारीही त्याने लखनऊतील अटलबिहारी वाजपेटी एकाना क्रिकेट स्टेडिअम येथे केएल राहुलच्या लखनऊ संघाविरोधात धावांचा रतीब घातला. त्यातील एक षटकार तर १०१ मीटर लांब खेचला.

शुक्रवार, १९ एप्रिल हा चेन्नई आणि धोनी यांचा १६वा वर्धापनदिनही होता. १९ एप्रिल, २००८ रोजी चेन्नईने पंजाबचा ३३ धावांनी पराभव केला होता. धोनीने लखनऊविरोधात दोन षटकार आणि आणि दोन चौकार लगावत नऊ चेंडूंत २८ धावा केल्या. त्यामुळे चेन्नईच्या २० षटकांत सहा बाद १७६ धावा झाल्या.

हे ही वाचा:

राज्यातील नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

‘सल्लामसलतीनंतर निवडणूक रोखे परत दाखल केले जातील’

मोदीस्तुती करणारे गाणे गाणाऱ्या युट्युबरवर मुस्लिम तरुणांचा हल्ला

नामदेव जाधव यांनी भरला बारामतीतून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज

रवी बिश्नोईने मोईन आली याला १८व्या षटकात बाद केल्यानंतर आठव्या क्रमांकावर आलेल्या ४२वर्षीय धोनीने आपल्या भात्यातील सर्व फटके लगावले. त्याने मोहसिन खानला तब्बल १०१ मीटर लांब षटकार खेचला. यश ठाकूरच्या शेवटच्या षटकातही धोनीने १९ धावा वसूल केल्या.

धोनीने आयपीएलच्या २०व्या षटकात एकूण ६५ षटकार खेचले आहेत. सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामातही धोनीने पाच सामन्यांत २५५.८८ सरासरीसह ८७ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा