31 C
Mumbai
Friday, May 24, 2024
घरविशेषदूरदर्शनचा लोगो आता केशरी रंगात

दूरदर्शनचा लोगो आता केशरी रंगात

Google News Follow

Related

देशाची प्रसार यंत्रणा असलेल्या दूरदर्शनने आता आपल्या लोगोचा रंग बदलला असून तो केशरी करण्यात आला आहे. डीडी न्यूजच्या अधिकृत एक्स खात्यावरून ही घोषणा करण्यात आली आहे. या पूर्वी दूरदर्शनचा रंग हा लाल होता आता केशरी झाल्यानंतर मात्र देशातील विरोधी पक्षांनी यावर गरळ ओकण्यास सुरुवात केली असून हे भगवेकरण असल्याची टीका करण्यात येऊ लागली आहे.
याबद्दल बोलताना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, नवीन लोगो आकर्षक केशरी रंगाचा आहे. हे दृश्य सौंदर्याचा बदल आहे. हा रंग केशरी आहे, भगवा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आम्ही फक्त लोगोच बदलला नाही, तर संपूर्ण लूक आणि फील अपग्रेड करण्यात आले आहे. आम्ही गेल्या सहा दिवसांपासून डीडीचा लुक आणि फील बदलण्यावर काम करत होतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या नव्या रंगाला भाजपशी संबंध जोडणे हे दुर्दैवी आहे. गेल्या काही वर्षांत दूरदर्शनने आपल्या लोगोचा रंग बदलून निळा, पिवळा आणि लाल केला आहे. लोगोच्या मध्यभागी असलेल्या दोन पाकळ्या आणि ग्लोब हे मात्र समान आहे.

हेही वाचा..

चेन्नईच्या धोनीने फटकावला १०१ मीटर लांब षटकार

‘सल्लामसलतीनंतर निवडणूक रोखे परत दाखल केले जातील’

हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस नेते ताजिंदर बिट्टूंच्या हाती ‘कमळ’

इस्त्रायल- इराणमधील तणावानंतर एअर इंडियाची तेल अवीव दरम्यानची विमानसेवा स्थगित

या निर्णयाविरोधात लगेच समाजमाध्यमात टीका होऊ लागली आहे. आपल्या सवयीप्रमाणे या निर्णयाला भाजपशी जोडण्यात येत आहे. याबद्दल राज्यसभेचे सदस्य आणि प्रसार भारतीचे माजी सीईओ जव्हार सरकार यांनी या निर्णयावर टीका करताना हे भगवेकरण असल्याचे म्हटले आहे. हे आता प्रसार भारती नाही तर प्रचार भारती झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२०१२ ते २०१४ या काळात माहिती आणि प्रसारण मंत्री असलेले काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी लोगोचा रंग बदलून सरकारी संस्थांवर कब्जा करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा