‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर दिल्ली सरकारमधील मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधींवर उपहासात्मक टिप्पणी करत म्हटलं की, देशभक्ती रक्तातून येते, कागद किंवा फॉर्म भरून नाही. राहुल गांधी चीनकडून चंदा घेतात, पाकिस्तानची भाषा बोलतात आणि तरीही स्वतःला भारतीय म्हणवतात, असा आरोप त्यांनी केला. बुधवारी मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, “राहुल गांधी कधीच या देशाचे होऊ शकत नाहीत. त्यांच्या आई सोनिया गांधी या देखील या देशातील नाहीत. देशभक्ती ही फॉर्म भरून येत नसते, ती रक्तातून येते. जर फॉर्म भरून देशभक्ती मिळत असती, तर रोहिंग्या आणि बांगलादेशमध्येही देशभक्ती असती. आम्ही देशासाठी जीवही देऊ शकतो, पण राहुल गांधींमध्ये तो जज्बा नाही.
त्यांनी पुढे म्हटलं की, “राहुल गांधी चीनकडून निधी घेतात, तुर्कीत ऑफिस उघडतात, पाकिस्तानची भाषा बोलतात आणि इंग्लंडचे कागदपत्रे घेऊन फिरतात. तरीही स्वतःला भारतीय म्हणवतात. अशा लोकांमध्ये देशभक्ती येणं शक्यच नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘छिटपुट युद्ध’ असा उल्लेख केला होता, यावर प्रतिक्रिया देताना सिरसा म्हणाले, “त्यांना एकदा सरहद्दीवर पाठवा, मग त्यांना समजेल की हे ‘छिटपुट’ काय असतं.
हेही वाचा..
पाकिस्तान, तुर्की, अझरबैजानच्या उत्पादनांचा बहिष्कार
अवैध बांधकामांवर प्रशासनाचा कठोर बडगा
दोन्ही वेळेला आंघोळ करणे का फायद्याचे, जाणून घ्या..
ओळखपत्रांशिवाय सिम विक्रीचा खेळ संपला
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी ‘ऑपरेशन सिंदूरने आपल्याला काय फायदा झाला?’ असा सवाल केला होता, यावर सिरसांनी प्रत्युत्तर दिलं, “त्यांना काही मिळायचंच नव्हतं. ज्या लोकांची ते काळजी करत आहेत, ते वाचणारे नाहीत. आणि जे वाचले आहेत, तेही आता टिकणार नाहीत. त्यांचं सोडून या देशाची काळजी करा — जो देश तुम्हाला खायला देतो, जो देश तुम्हाला सत्तेवर बसवतो. तिरंगा यात्रेविषयी बोलताना सिरसा म्हणाले, “मला आज खूप आनंद होत आहे की आमच्या तीनही सैन्यदलांच्या पराक्रमासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर शीख समुदायाने तिरंगा घेऊन यात्रा काढली. त्यांनी १०० किलोमीटर पाकिस्तानमध्ये घुसून जे शौर्य दाखवलं, त्याला आम्ही सलाम करतो. मी सैन्याच्या जवानांना सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्या मातांच्या चरणांना वंदन करतो.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर देशभरात भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बुधवारी शीख समुदायातर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि कॅबिनेट मंत्री मनजिंदर सिंग सिरसा सहभागी झाले होते.







