31 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरविशेषकुणी घर देतं का घर! म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा

कुणी घर देतं का घर! म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा

Google News Follow

Related

स्वस्तातील घरांसाठी सर्वसामान्य जनता म्हाडाकडे आस लावून बसली असली तरी हे स्वप्न आता स्वप्नच राहणार की काय अशी चिंता वाटू लागली आहे. राज्यातील परिस्थिती आलबेल नसताना, आता घर घेणारे सुद्धा चिंतेत आहेत. गेली दोन वर्षे म्हाडाची सोडत निघाली नसल्याने, आता सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

घरेच शिल्लक नसल्याने सलग १२ वर्षे निघणाऱ्या सोडतीत खंड पडलेला आहे. मुंबईसारख्या शहरात परवडणारे घर तेही हक्काचे हा स्वप्नवत प्रवास आहे. म्हणूनच हक्काचे घर मिळवण्याच्या स्वप्नासाठी सर्वसामान्यांची भिस्त ‘म्हाडा’वर असते. असे असले, तरीही ठाकरे सरकारच्या काळात मात्र या स्वप्नाला खीळ बसली आहे.

गेल्या दोन वर्षांत म्हाडाच्या घराची एकही सोडत निघालेली नाही. २००८ पासून सलग १२ वर्षे म्हाडाला सामान्यांचे गृहस्वप्न साकार करत आहे. परंतु ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर २०१९ नंतर सोडतच काढता आलेली नाही. त्यामुळेच आता सर्वसामान्यांचे गृहस्वप्न लांबणीवर पडले आहे. म्हाडाने २००८साली सुरू केलेल्या सोडतीत प्रतिवर्षी अनुक्रमे ८७०, ३७६३, ३४४९, ४०३४, ८७६, १२४४, ८१४, १०४६, ९७२, ८१९, १३८४, २१७ अशी घरे दिलेली आहेत. यातील सर्वाधिक घरे २००९ (३७६३), २०१० (३४४९) आणि २०११ (४०३४) या वर्षात मिळालेली आहेत.

हे ही वाचा:

टाळेबंदीला कंटाळून व्यावसायिकाने केला आत्मघात

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा

ठाकरे सरकार तरुणांना स्वप्निल लोणकरच्या मार्गावर लोटत आहे

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू?

आधीच मागणीच्या तुलनेत कमी घरे असलेल्या म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे आता तर घरेच शिल्लक नाहीत. त्यामुळे २०२०ला सोडत निघाली नाही तर २०२१ मध्येही सोडतीची शक्यता नाही. त्यामुळे सर्वसामान्य अत्यल्प आणि अल्प गटातील इच्छुकांचे घराचे स्वप्न दूरच राहात असल्याचे चित्र आहे. मुंबईत जागाच शिल्लक नसल्याचे कारण सध्याच्या घडीला म्हाडाकडून देण्यात आलेले आहे. परंतु पुनर्विकास योजनेंतर्गत रखडलेल्या इमारती हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा