32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषमोदींनी बोलवली महत्वाची सुरक्षा विषयक बैठक

मोदींनी बोलवली महत्वाची सुरक्षा विषयक बैठक

Google News Follow

Related

कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार, 8 डिसेंबर) संध्याकाळी ६:३० वाजता सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक त्यांच्या अधिकृत निवासस्थानी बोलावली आहे.

हेलिकॉप्टर अपघातात सहभागी १४ पैकी १३ जवानांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत देखील होते, तथापि, त्यांच्या प्रकृतीविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

भारतीय हवाई दलाने जनरल रावत यांच्या कर्मचार्‍यांच्या नावांची यादी जारी केली आहे जे क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस जनरल रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या व्यतिरिक्त, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/एनके विवेक कुमार, एल/एनके बी साई तेजा आणि हव सतपाल हे विमानात आहेत. दुपारी १२:२० च्या सुमारास निलगिरी जिल्ह्यातील जंगलात हे हेलीकॉप्टर कोसळले.

आयएएफने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संसदेचं अधिवेशन सुरु असल्यामुळे अशा प्रकारची महत्वाची माहिती सर्वप्रथम खासदारांना देणे हा खासदारांचा विशेषाधिकार आहे. त्यामुळे उद्या ही माहिती थेट संसदेतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देतील.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार

अमरिंदर सिंग- शेखावत चर्चेत युतीवर चर्चा?

अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार

इम्रान खानच्या ‘नया पाकिस्तान’ची ही दशा

सीडीएस बिपिन रावत यांचा समावेश असलेल्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत विचारले असता दरम्यान, केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, “घडलेल्या अपघाताची संपूर्ण माहिती संबंधित मंत्रालयाकडून योग्य वेळी दिली जाईल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा