28.6 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरविशेषपंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर जाणार नाहीत!

पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर जाणार नाहीत!

विजय दिनाच्या परेडला राहणार होते उपस्थित 

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला भेट देणार नाहीत. रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९ मे रोजी होणाऱ्या त्यांच्या विशेष कार्यक्रम, ‘विजय दिन परेड’मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवरील विजयाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त हा समारंभ आयोजित केला जातो. त्यावेळी रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रेई रुडेन्को यांनी सांगितले होते की, या उत्सवासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. तथापि, आता अशी माहिती मिळत आहे की पंतप्रधान मोदी मॉस्कोमध्ये होणाऱ्या विजय दिन परेडमध्ये सहभागी होणार नाहीत.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी याबाबत आज (३० एप्रिल) माहिती दिली. पंतप्रधानांच्या या निर्णयामागील कारण रशियन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नसले तरी, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. भारताने या घडामोडीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या महिन्याच्या सुरुवातीला, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पुष्टी केली की पंतप्रधान मोदींना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ९ मे रोजी मॉस्को येथे होणाऱ्या विजय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले आहे. तथापि, मंत्रालयाने सांगितले होते की भारताच्या सहभागाबाबतची घोषणा योग्य वेळी केली जाईल.

रशियाची सरकारी वृत्तसंस्था टीएएसएसने (TASS) भारतीय सरकारी सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावर्षी विजय दिनाच्या परेडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात.

हे ही वाचा : 

जगाला माहिती आहे पाकिस्तान काय आहे

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चिन्मय दास यांना जामीन मंजूर!

मी इथे मतदान केले, माझ्याकडे रेशन कार्ड आहे, आता पाकिस्तानला जाऊन काय करू?

माजी रॉ प्रमुख आलोक जोशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सीसीएस बैठकीत भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, त्यांच्या अनेक यूट्यूब चॅनेल आणि एक्स हँडलवर बंदी घालणे यांचा समावेश आहे. याशिवाय, पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारच्या निर्णयानंतर तशी कारवाई सुरु आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा