27 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेषपंतप्रधान मोदी येणार, घसघशीत भेट देणार

पंतप्रधान मोदी येणार, घसघशीत भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदीबुधवारी मुंबई दौऱ्यावर

Google News Follow

Related

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी गुरुवार, १९ जानेवारी हा दिवस खूप विशेष असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी पाच वाजता मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुंबईकरांना ते घसघशीत भेट देणार आहेत.

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री हाऊस येथे आढावा बैठक घेतली. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असेल.बीकेसी मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभास्थळाचा आढावा घेतला.

पंतप्रधान आपल्या या दौऱ्यामध्ये तब्बल ३८,८०० कोटी रुपयांची विविध विकास कामाणची मुंबईकरांना भेट देणार आहेत . पंतप्रधान संध्याकाळी ६.३० वाजता मुंबई मेट्रो – २ ए आणि ७ या दोन मार्गांचे उद्घाटन करतील. पंतप्रधान मोदी मेट्रोने प्रवास करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान उद्या संध्याकाळी १२,६०० कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवतील. दहिसर आणि डीएन नगर ला जोडणारी मेट्रो अंदाजे १८. ६ किमी लांब तर अंधेरी – दहिसरला जोडणारी मेट्रो अंदाजे१६.५ किमी लांब आहे. २०१५ मध्ये पंतप्रधानांनी या मार्गांची पायाभरणी केली होती.

मोबाईल एप लाँच करणार

पंतप्रधान मुंबई-१ मोबाईल एप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड लाँच करतील. हे मोबाईल एप प्रवास सुलभ करणार आहे. मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावर दाखवता येईल आणि यूपीआयद्वारे तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल पेमेंटला मदत करेल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरले जाईल आणि नंतर ते लोकल ट्रेन आणि बसेससह सार्वजनिक वाहतुकीच्या इतर वाहनांसाठी उपयोगात आणण्यात येईल .

सात सांडपाणी प्रकल्पांची पायाभरणी

मुंबई भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी सुमारे १७,२०० कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. मालाड, भांडुप, वर्सोवा, घाटकोपर, वांद्रे, धारावी आणि वरळी येथे हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. ज्याची एकत्रित क्षमता सुमारे २,४६० एमएलडी असेल.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

आपला दवाखानाचे अनावरण

मुंबईतील आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी २० व्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे लोकांना आरोग्य तपासणी, औषधे, चाचण्या आणि निदान यासारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.

सीएसएमटीचा होणार कायपालट

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. टर्मिनसची गर्दी कमी करण्यासाठी, सुविधा वाढवण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचे प्राचीन वैभव जतन करणे असा उद्देश पुनर्विकासाच्या मागे आहे. १,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा