28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषपीएफआयच्या निशाण्यावर होते पंतप्रधान

पीएफआयच्या निशाण्यावर होते पंतप्रधान

Google News Follow

Related

राष्ट्रीय सुरक्षा संस्थांनी शुक्रवारी दिवसभर पीएफआय कार्यालये आणि संलग्न संस्थांवर कारवाई केली. यामध्ये सर्वात मोठा खुलासा पीएफआयच्या एका सदस्याने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा रॅली हे लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले आहे.

पीएफआय फुलवारी शरीफ मॉड्युलचा भंडाफोड केल्याने षड्यंत्रांची एक मोठी यादी उघडकीस आली आहे. एनआयएने तपास सुरू केल्यानंतर देशद्रोहाचा मोठा कट उघड झाला आहे. २३ सप्टेंबर २०२२ रोजी देशातील पीएफआय कार्यालये आणि सदस्यांवर छापेमारी हा त्याचाच एक भाग होता. ज्यामध्ये पकडले गेलेले पीएफआय सदस्य शफिक पैठ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ जुलै रोजी पाटण्यात होणारी रॅली हे त्यांचे लक्ष्य होते. त्या रॅलीत घुसून पीएफआय सदस्यांना दहशत पसरवायची होती. त्यासाठी अतिरेकी संघटनेने पोस्टरही तयार केलेले होते.

देशाविरुद्ध परदेशातून करोडोचा पैसा
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशविरोधी मोहिमेसाठी देश-विदेशातून १२० कोटी रुपये जमा झाले. शफिक पैठ यांच्या म्हणण्यानुसार, पीएफआय खात्यात जमा केलेल्या दुप्पट रक्कम रोख स्वरूपात आली. २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा या सर्वांचा उद्देश होता. ज्यासाठी हिंदूंना मारण्याचा, धर्मांतर करण्याचा कट रचला गेला आहे.

हे ही वाचा:

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

देशव्यापी कारवाईत १०६ जणांना अटक
शुक्रवार २३सप्टेंबर रोजी झालेल्या कारवाईत देशभरातून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या १०६आरोपींना अटक करण्यात आली आहे. बहुतांश आरोपींना केरळमधून अटक करण्यात आली आहे. केरळमधून २२ पीएफआय सदस्यांना अटक करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ पीएफआयने केरळ बंदचेही आयोजन केले होते

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा