29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर विशेष दोन दिवसांच्या वेतन कपातीवर पोलीस दलाची नाराजी

दोन दिवसांच्या वेतन कपातीवर पोलीस दलाची नाराजी

Related

सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्याचे दोन दिवसाचा वेतन कपातीच्या निर्णयावर पोलीस दलाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस दलातील नाराजीच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. याबाबत राज्याच्या पोलीस महासंचालक यांना देखील पोलिसांचे वेतन कपात करू नये अशी लेखी स्वरूपात विनंती करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन मध्ये अविरत सेवा देणाऱ्या पोलिसांना शासनाकडून करोना काळात विशेष भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली होती. हा भत्ता अद्याप पोलिसांना मिळालेला नसतांना वेतन कपातीचा निर्णय पोलिसांवर लादू नये असे पोलिसांचे म्हणणे आहे.

राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी,अधिकारी तसेच सेवानिवृत्त यांचे वेतनातुन एक ते दोन दिवसांचे वेतन कपात करणेचे निर्णय राज्य शासनाकडून जाहिर करण्यात आला आहे. कपात करण्यात आलेले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. मात्र या वेतन कपातीला घेऊन पोलीस दलाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही पोलिसांकडून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद पोलीस दलातील बनसोड दादा नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करून त्यात त्याने आपले वेतन कापले जावू नये असे म्हटले होते. पोलीस रात्र दिवस काम करतो त्याला कुठलाही जास्तीचा भत्ता दिला जात नाही. त्यामुळे कुठल्याही पोलिसांचे वेतन कापू नये. जे सरकारी अधिकारी कर्मचारी घरी बसून वेतन घेतात त्याच्या वेतनातून खुशाल कपात करा, असे ही बनसोड यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराने वेतन कपातीवर हरकत घेतली असून तसे पत्र त्याने आपल्या वरीष्ठांना पाठवले आहे. या पत्रात त्याने पोलीस हवालदाराचा विषेश भत्ता रुपये ७५० देण्यात आलेले नाही, कालबध्द पदोन्नती दिलेली नाही. १०, २०, ३० वर्षाचा लाभ दिला नाही. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती न दिल्याने २/३ वेतनवाढ मिळाली नाही. महागाई भत्ता गोठण्यात आलेला आहे. सेवानिवृत्त पोलीस बांधवांना गेली चार वर्षे झाली तरीही त्यांची हक्काची सेवानिवृत्ती नंतर मिळणारी सर्व देय रक्कम पेन्शनसह दिलेली नाही तसेच पोलीसांना गेले वर्षपासून कोवीड भत्ता दिलेला नाही. असे मुद्दे हरकतीत मांडले आहेत.

सरकारी कर्मचारी आधिकारी याच्या वेतन कपातीवर पोलीस दलाकडून नाराजी व्यक्त करून राज्याचे पोलीस महासंचालक यांना ही पोलिसांची वेतन कपात रोखण्यात यावी अशी विनंती केली आहे. ज्या पोलीस अधिकारी आणि अंमलदाराला वेतन कपातीवर हरकत असेल त्यांनी अर्ज करून वरिष्ठांना कळवावे असे त्यांना सांगण्यात आलेले असून राज्यातील अनेक पोलिसांनी हरकतीचे अर्ज आलेले असल्याचे एका जेष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा