27 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरविशेषसोशल मीडियापासून लांब राहण्यासाठी लँडलाइनला पसंती

सोशल मीडियापासून लांब राहण्यासाठी लँडलाइनला पसंती

Related

अलेक्झांड्रिया येथे काम करणारी ३० वर्षीय कार हिला पुन्हा लँडलाइन असतानाच्या काळात जायची इच्छा आहे. कार हिला कोरोना महामारीच्या काळात मला स्मार्टफोनवरील लक्ष विचलित करणार्‍या सर्व गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवायचे होते, असे ती म्हणाली. गेल्या उन्हाळ्यात, चॅनेल कारने सहा लँडलाइन फोनचा संग्रह केला होता. हे सर्व लँडलाइन कार्यरत आहेत.

लँडलाइन फोनची जागा आता नव्या स्मार्ट वायरलेस फोनने घेतली आहे. एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार २००३ पर्यंत ९० टक्के लोकांच्या घरात कार्यरत लँडलाइन होते. तर, जून २०२१ पर्यंत ही संख्या ३० टक्क्यांहून कमी झाली. अजूनही लँडलाइन प्रिय असणाऱ्या लोकांकडून लँडलाइन हा स्मार्ट फोन पेक्षा उत्तम आणि वापरायला योग्य असल्याचे सांगितले जाते.

जानेवारी महिन्यामध्ये एमिली केनेडी या महिलेने तिच्या वडिलांच्या कार्यालयातील जुना कॅलामाइन-लोशन-गुलाबी रोटरी फोन सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी म्हणून वापरायला सुरुवात केली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांना ही कल्पना सुचली. त्यांनी स्वतःचा स्मार्टफोन आणि लँडलाइन ब्लूटूथने जोडली त्यामुळे लँडलाइनवर आलेला कॉल मोबाईलवर घेता येतो.

हे ही वाचा:

लवकरच मुंबई होणार शंभर टक्के लसवंत!

दिल्लीहून श्रीनगरला जाणारं विमान खांबाला धडकलं

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची हिजाबच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात धाव

‘अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर उद्धव साहेबांनी विचार करायला हवा’

मॅट जेनिंग्स यांनी ओल्ड फोन वर्क्स या कंपनीत काम केले आहे. ही कंपनी लँडलाइन फोनचे नूतनीकरण करून विक्री करते. गेल्या दोन वर्षांत १९५० आणि १९६० च्या दशकात ग्राहकांची कँडी-रंगीत रोटरी फोनची मागणी वाढली आहे. गेल्या सहा- सात वर्षांमध्ये या लँडलाइनसाठी एक किंवा दोन ऑर्डर असायच्या आणि आता या लँडलाइन कमाईच्या प्राथमिक स्त्रोतांपैकी एक आहे, असे जेनिंग्स म्हणाले. लँडलाइनचा वापर म्हणजे अगदीच मूलभूत गोष्टींकडे परत येण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. लँडलाइनला असलेल्या वायरमुळे तुम्ही फोन घेऊन कुठेही जाऊ शकत नाही. तेवढ्याच जागेत तुम्ही बांधले जाता आणि त्यामुळे तुम्ही विचलित न होता प्रत्यक्ष संभाषण करू शकता, असेही ते म्हणाले.

रॅचेल लहबाबीने २०२१ च्या सुरुवातीला लँडलाइन फोन ऑनलाइन विकण्यास सुरुवात केल्यानंतर लोकांची लँडलाइनसाठीची आवड वाढल्याचे लक्षात त्यांच्या आले. काही लँडलाइन हे सर्वाधिक पाहिलेल्या उत्पादनांपैकी होते, असेही त्या म्हणाल्या. ओठांच्या आकाराचे गुलाबी फोन तिच्या ग्राहकांमध्ये विशेषतः लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडेच लँडलाइन फोन घेतलेले अनेकजण ते नवीन तंत्रज्ञानासह वापरत आहेत, तर काही जण पारंपारिक पद्धतीने वापरणं पसंत करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,938चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा