अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवार, १९ नोव्हेंबर रोजी भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी वर्ल्डकप २०२३ चा महामुकाबला म्हणजेच अंतिम सामना होणार आहे. क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये या सामान्यासाठी उत्सुकता असून हा रोमांचक सामना पाहण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘दैनिक जागरण’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये रंगणाऱ्या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजर असणार आहेत. याशिवाय या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे हे निमंत्रण स्वीकारुन ते सुद्धा अंतिम सामना पाहण्यासाठी येतील, अशी शक्यता आहे.
रविवारी ऑस्ट्रेलियन अंघ आठव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा तर भारताने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. दोन दिवसांपूर्वीच भारताने न्यूझीलंडला ७० धावांनी नमवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३९७ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ३२७ धावा केल्या.
हे ही वाचा:
नूहमध्ये पुन्हा जातीय तणाव; विहिरीचे पूजन करण्यास जाणाऱ्या महिलांवर मदरशातून दगडफेक?
अहमदाबादमधील ‘फायनल’ ठरते आहे महागडी
मुंबईतील हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई
वर्षा गायकवाड यांचे आरोप खोडसाळ स्वरूपाचे
दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आमनेसामने होते. गुरुवारी कोलकाताच्या इडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिली बॅटिंग करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्स गमावून ४७.२ ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं.







