28.6 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरविशेषराहुल गांधी हेच एक नंबरचे अतिरेकी

राहुल गांधी हेच एक नंबरचे अतिरेकी

केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचा घणाघात

Google News Follow

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नुकत्याच अमेरिकेच्या दौऱ्यात शिखांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल फटकारले आहे, त्यांना “देशाचा नंबर एकचा दहशतवादी” संबोधले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी हे भारतीय नाहीत असा दावा त्यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल गांधींवर टीका केली आणि म्हटले की त्यांना पकडण्यासाठी बक्षीस मिळायला हवे कारण ते “देशाचे सर्वात मोठे शत्रू” आहेत. यापूर्वी त्यांनी मुस्लिमांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण तसे झाले नाही आणि आता ते शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. जे दहशतवादी आहेत त्यांनीही राहुल गांधींच्या या वक्तव्याचे कौतुक केले आहे. जेव्हा असे लोक राहुल गांधींना पाठिंबा देत आहेत, तेव्हा ते देशातील नंबर एकचे दहशतवादी आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा..

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या पत्रकाराची सॅम पित्रोदांनी मागितली माफी

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या पाठीशी झारखंड मुक्ती मोर्चा

मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाने बोगस अटकेच्या नोटीस

पश्चिम बंगालमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर टाकला ‘लोखंडी पत्रा’

ते म्हणाले, माझ्या मते, देशाच्या सर्वात मोठ्या शत्रूला किंवा कोणाला पकडण्यासाठी बक्षीस असायला हवे असेल तर ते राहुल गांधी आहेत. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे एका कार्यक्रमात शिखांचे उदाहरण देत भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर केलेल्या वक्तव्याने राजकीय वादळ उठले होते.

दरम्यान, रवनीत सिंग बिट्टू यांनी असा दावा केला की राहुल गांधी हे भारतीय नाहीत कारण त्यांनी आपला बहुतांश वेळ भारताबाहेर घालवला आहे. त्यांचे मित्र आणि कुटुंब तिथेच आहेत. त्यामुळेच मला वाटते की कुठेतरी त्यांचे देशावर फारसे प्रेम नाही. परदेशात आणि भारताबद्दल अशा नकारात्मक गोष्टी बोलतात, असे ते म्हणाले. आजपर्यंत त्यांना चर्मकार, सुतार, वाहने दुरुस्त करणारा यांच्या व्यथा समजल्या नाहीत. आज ते फोटो काढत फिरत आहेत, त्यांना त्यांच्या समस्या विचारात आहेत हे फक्त त्यांचा फोटो छापून यावा, यासाठी ते करत आहेत. हाच मोठा विनोद असल्याचे ते म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा