28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरविशेषआता रेल्वेत महिन्याला होणार २४ तिकिटांचे बुकिंग

आता रेल्वेत महिन्याला होणार २४ तिकिटांचे बुकिंग

Related

रेल्वेने तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल केला आहे. या नवीन नियमामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने सुखद धक्का दिला आहे. प्रवासी आता महिन्याला दुप्पट तिकीट बुक करू शकणार आहे.

एका महिन्यात ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी ज्यांचे लॉगिन आयडी आधारशी लिंक केलेले नाही. त्यांची संख्या ६ होती ती आता ६ वरून १२ करण्यात आली आहे. तर आधार लिंक युजर आयडी असलेल्या ग्राहकांसाठी जास्तीत जास्त तिकीट बुक संख्या १२ वरून २४ करण्यात आली आहे. जे लोक वारंवार ये-जा करतात, त्यांच्यासाठी ही सुविधा खूप उपयुक्त असल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

सोनिया गांधींनी मागितली ईडीकडे वेळ

पंतप्रधान मोदींनी केली नवीन नाणी लाँच

जीवे मारण्याच्या धमकीनंतर नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा

आत्मनिर्भर भारतासाठी ७६,३९० कोटींच्या संरक्षणविषयक सामग्रीच्या खरेदी प्रस्तावांना मान्यता

या निर्णयावर बोलताना रेल्वे अधिकारी म्हणाले की, रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वेने जास्त प्रवास करणा-यांना दिलासा मिळणार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी एका खात्यातून तिकीट बुक करणा-यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वे नेहमी करत असते. रेल्वेने प्रवाशांसाठी एक हेल्पलाईन सुरु केली आहे. १३९ हा क्रमांक इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टमवर आधारित एक हेल्पलाइन क्रमांक आहे. यामध्ये अनेक भाषांमध्ये माहिती दिली जाते. यासोबतच सुरक्षा, वैद्यकीय मदत, अपघाताच्या माहितीसाठी १ नंबर डायल करावा लागेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा