27 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरविशेषरामेश्वरम कॅफे स्फोट; संशयिताचे धागेदोरे आयएसआयकडे!

रामेश्वरम कॅफे स्फोट; संशयिताचे धागेदोरे आयएसआयकडे!

आरोपी अजूनही मोकाट

Google News Follow

Related

बेंगळुरूतील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाच्या तपासात धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. कॅफेत स्फोटके ठेवणारा संशयित आणि बल्लारी आयएसआयएस मॉड्यूल यांच्यातील संभाव्य संबंध सूचित करणारे काही पुरावे समोर येत आहेत. रामेश्वरम कॅफेमधील स्फोट आणि आयएसआयएसशी संबंधित प्रकरणांमध्ये अनेक साम्य दिसून आले आहे. मात्र आयएसआयएस बल्लारी मॉड्यूल अद्याप सक्रिय आहे की नाही, याबाबत अजून स्पष्टपणे काही समजू शकलेले नाही.

यातील महत्त्वाचे साम्य म्हणजे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसेस (आयईडी)ची जोडणी. शिवाय, स्फोटाच्या अंमलबजावणीमध्येही मंगळुरू कुकर स्फोटासह राज्यात यापूर्वी झालेल्या अशा स्फोटांशी साम्य दिसून आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयएसआयएस बल्लारी मॉड्यूल प्रकरणात आठ दहशतवाद्यांना अटक केली होती. ज्यात त्यांचा नेता मिनाझचाही समावेश होता. एनआयएने कर्नाटकातील बल्लारी आणि बेंगळुरू, महाराष्ट्रातील अमरावती, मुंबई आणि पुणे; झारखंड आणि दिल्लीतील जमशेदपूर आणि बोकारो अशा १८ ठिकाणी छापे टाकले होते. छाप्यांमध्ये सल्फर, पोटॅशियम नायट्रेट, चारकोल, गनपावडर आणि इथेनॉल यांसारखा स्फोटक कच्चा माल तसेच, धारदार शस्त्रे, बेहिशेबी रोकड आणि स्मार्टफोन, अन्य डिजिटल उपकरणांसह गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.

आरोपींनी आयईडी तयार करण्यासाठी स्फोटक कच्चा माल वापरण्याची योजना आखली होती, जी दहशतवादी कृत्ये करण्यासाठी वापरली जाणार होती. आणखी एक साम्य म्हणजे बेंगळुरू स्फोटही मंगळुरू कुकर स्फोटप्रमाणे एकट्याने करण्यात आला होता. स्फोटानंतर रामेश्वरम कॅफेमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रामेश्वरम कॅफेमध्ये प्रवेश करताना पांढरी टोपी आणि मास्क आणि चष्मा घातलेली एक व्यक्ती बॅकपॅक घेऊन फिरताना दिसत आहे. तपास पथकाने स्फोटक उपकरणाशी संबंधित टायमर, बॅटरी, सर्किट, पॅनेल आणि वायर जप्त केले आहेत. संशयित दहशतवाद्याने ग्राहक असल्याचे भासवत नाश्ता करण्याचे नाटक करत हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला. हे उपकरण बनवण्यासाठी लागणारे साहित्य फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) कडे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले.

हे ही वाचा:

‘विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा’

निवडणूक रोख्यांच्या तपशीलासाठी एसबीआयला हवी ३० जूनपर्यंत मुदतवाढ!

स्वतःच्या जुळ्या मुलांना पाहण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी धाव

रेस्टॉरंटमध्ये माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच जण रुग्णालयात

आयएसआयएस बल्लारी मॉड्यूल व्यतिरिक्त या स्फोटाचे धागेदोरे दहशतवादी अब्दुल करीम टुंडा उर्फ “डॉक्टर ऑफ बॉम्ब” याच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तैयबाच्या मॉड्यूलशी देखील जोडले जात आहेत. बेंगळुरूमधील हल्ल्याच्या एक दिवस आधी राजस्थानमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोट प्रकरणात टुंडाची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
गेल्या वर्षी बेंगळुरूमध्ये लष्कर मॉड्यूलने आखलेला आत्मघाती हल्लाही एनआयएने हाणून पाडला होता. रामेश्वरम कॅफे स्फोट हा उत्तर प्रदेशातील देवबंद येथील सिमीच्या पीएफआय मॉड्यूलने केल्याचेही बोलले जात आहे.

आयएसआयएस कर्नाटकमध्ये आपला प्रभाव वाढवत आहे, तर पीएफआय आर्थिक अडचणींमुळे आणि केंद्रीय संस्थांच्या देखरेखीमुळे पुन्हा एकदा आपले स्थान बळकट करण्यासाठी संघर्ष करत आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे परंतु आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. आरोपी तामिळनाडूच्या दिशेने पळून गेल्याचा संशय आहे.

रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे
गृह मंत्रालयाने बेंगळुरू रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवली आहे. एनआयएच्या पथकाने स्फोटाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर हे प्रकरण गेल्या आठवड्यात एनआयएकडे सोपवण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा