33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेषधक्कादायक! उंदरांनी कुरतडले बेशुद्ध रुग्णाचे डोळे

धक्कादायक! उंदरांनी कुरतडले बेशुद्ध रुग्णाचे डोळे

Google News Follow

Related

मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील प्रकार

मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात एका रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे श्रीनिवास यल्लाप्पा असे रुग्णाचे नाव असून तो अवघ्या चोवीस वर्षांचा आहे.

दोन दिवसांपूर्वी श्रीनिवास यल्लप्पा याला घाटकोपर येथील राजावाडी या रुग्णालयात दाखल केले होते. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित हे रुग्णालय येते. श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे यल्लप्पाला त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याला मेंदूज्वर झाल्याचे, तसेच त्याचे लिव्हर खराब असल्याचे निदान झाले. रुग्णालयातील डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून त्याला रुग्णालयाच्या आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. पण बेशुद्ध अवस्थेत असलेल्या श्रीनिवास यल्लाप्पाचे डोळे उंदरांनी कुरतडल्याचा प्रकार समोर आला आणि साऱ्यांनाच धक्का बसला.

हे ही वाचा:

भारत आणि फिजीमध्ये नवा सामंजस्य करार

ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ

उद्धव ठाकरे नाना पटोलेंवर नाराज?

२० दिवसांच्या विक्रमी वेळेत भारतीय रेल्वेने बांधला उड्डाणपूल

मंगळवार, २२ जून रोजी सकाळी हा सारा प्रकार समोर आला आहे. श्रीनिवास याचे नातेवाईक त्याला बघण्यासाठी राजावाडी रुग्णालयात गेले असताना श्रीनिवासच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे त्यांना दिसले. हे रक्त पाहून सर्वांनाच धक्का बसला. हा सारा प्रकार वेगळाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणून जवळ जाऊन नीट पाहिले असता श्रीनिवासचे डोळे उंदरांनी कुरतडल्याचे त्यांना समजले.

हा प्रकार पाहून रुग्णांच्या नातेवाईकांचा चांगला संताप झाला उपस्थित नर्सला या साऱ्या प्रकाराबद्दल जाब विचारला. पण तिने धड उत्तरे न देता उर्मटपणा केल्याचा आरोप श्रीनिवासच्या नातेवाईकांनी केला आहे. तर हा प्रकार बाहेर आल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकारामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील सावळा गोंधळ पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा